हुमा कुरेशीची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा आहे. तिची बहुचर्चित वेब सीरिज महाराणीचा दुसरा सीझन अलिकडेच प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सध्या सर्वत्र तिच्या अभिनयाचे कौतुक होताना दिसत आहे. ‘महाराणी’ व्यतिरिक्त हुमा सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळेही चर्चेत आहे. हुमा कुरेशीने २०१२ मध्ये अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. अलिकडेच हुमाने अनुराग कश्यपसोबतच्या पहिल्या भेटीचा एक रंजक किस्सा शेअर केला आहे.

हुमा कुरेशीने एका मुलाखतीत अनुराग आणि तिच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. ती म्हणाली, “अनुराग कश्यपशी पहिली भेट झाल्यामुळे मला या चित्रपटासाठी ऑडिशन द्यावे लागले नाही. पण या भेटीच्या वेळी माझं बोलणं ऐकून त्यांना मला मूर्ख असं म्हटलं होतं.” हुमा कुरेशीने चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी अनेक जाहिरातींसाठी काम केले होते. आमिर खानसोबत मोबाईलची जाहिरात करताना अनुराग कश्यपने तिचं अभिनय कौशल्य ओळखलं होतं. अनुराग कश्यप या जाहिरातीचे दिग्दर्शन केलं होतं. दरम्यान, अनुराग कश्यपने हुमाला वचन दिले होते की तो तिला त्याच्या चित्रपटात कास्ट करेल, पण हुमाला यावर विश्वास बसला नव्हता.
आणखी वाचा- औरंगाबादमधून बेपत्ता झालेली युट्यूबर ‘बिंदास काव्या’ अखेर सापडली, पालकांनी मानले पोलिसांचे आभार

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हुमा म्हणाली, ‘ते चार दिवसांचं शूट होतं. शूटिंगच्या दुसऱ्या दिवशी अनुराग कश्यप म्हणाला, “मी तुला चित्रपटात कास्ट करेन.” हुमा पुढे म्हणाली, ‘आणि मी गाढव नंबर वन, त्याला म्हणाले, “मी नुकतीच मुंबईला आले आहे. मी ऐकले आहे की तुला खूप संघर्ष करावा लागेल. असा चित्रपट मिळणे सोपे नाही.” त्यावर अनुराग म्हणाला, “मूर्ख आहेस का?” त्याच्या या बोलण्यावर मी म्हणाले, “हो, थोडीशी आणि अशाप्रकारे ‘गँग्स ऑफ वासेपूर’ मला मिळाला. मला चित्रपटासाठी ऑडिशन देण्याची गरज पडली नाही.”

आणखी वाचा- ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील मुख्य भूमिकेसाठी मनोज बाजपेयी नव्हे, तर ‘हा’ अभिनेता होता अनुरागची पहिली पसंती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हुमा म्हणते, “मी नशीबवान होते की मला जास्त संघर्ष करावा लागला नाही. पहिला चित्रपट मला अगदी सहज मिळाला आणि त्यानंतर पुढचे चार-पाच चित्रपटही सहज मिळाले.” हुमा कुरेशीने यावर्षी चित्रपटसृष्टीत एक दशक पूर्ण केले आहे. कामाबद्दल बोलायचं तर यंदा तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. ती लवकरच ‘डबल एक्सएल’ चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये ती सोनाक्षी सिन्हासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय ‘पूजा मेरी जान’मध्येही हुमा दिसणार आहे. याशिवाय ती नेटफ्लिक्सच्या ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’ या चित्रपटातही दिसणार आहे.