बॉलिवूडमधील संगीतकार-अभिनेता हिमेश रेशमियाचा ‘द एक्स्पोझ’ हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या हिमेश रेशमियाने अभिनेता सलमान खानचे आभार मानले आहेत. आजवरच्या आयुष्यात प्रत्येक वेळी सलमान खानने मला पाठिंबा देत माझ्या मार्गदर्शकाची भूमिका निभावल्याचे हिमेशने सांगितले. आयुष्यात मला जे काही मिळाले आहे, त्यासाठी मी सदैव सलमान खानचा ऋणी राहीन अशा शब्दांत हिमेशने आपल्या भावना व्यक्त केल्या. सलमान खानने ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटातून हिमेशला पहिल्यांदाच संगीतकार म्हणून मोठी संधी मिळवून दिली. त्यानंतर या जोडीने ‘ये हे जलवा’ ‘दुल्हन हम ले जायेंगे’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांसाठी एकत्र काम केले. सलमान खानच्या २००३ साली आलेल्या ‘तेरे नाम’ या चित्रपटाने तर हिमेश रेशमियाला संगीतकार म्हणून प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले. त्यानंतर हिमेशने अभिनेता म्हणून आपले नशीब आजमावयला सुरूवात केली. या काळात सलमान आणि हिमेश रेशमिया यांच्यात काही कारणाने वितुष्ट निर्माण झाले होते. मात्र, २०११ साली ‘बॉडीगार्ड’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येऊन दोघांनी त्यांच्यातला वादावर पडदा टाकला.
संग्रहित लेख, दिनांक 9th May 2014 रोजी प्रकाशित
‘आयुष्यात मला जे काही मिळाले आहे, त्यासाठी मी सलमानचा सदैव ऋणी राहीन’
बॉलिवूडमधील संगीतकार-अभिनेता हिमेश रेशमियाचा 'द एक्स्पोझ' हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

First published on: 09-05-2014 at 03:47 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am indebted to salman khan for whatever i am today himesh reshammiya