बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा लोकप्रिय अभिनेता आहे. रणबीर कपूरने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहे. रणबीर कपूरचे लाखो चाहते आहेत. त्याने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत काम करत सुपरहिट चित्रपट दिले आहे. पण तुम्हाला माहितीये का? रणबीर कपूरचा एक चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी नोकरी सोडली होती. प्रसिद्ध चित्रपट निर्माते इम्तियाज अली यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रणबीर कपूरने निर्माते इम्तियाज अलीच्या यांच्यासोबत ‘रॉकस्टार’ आणि ‘तमाशा’ अशा दोन चित्रपटात काम केले आहे. ‘तमाशा’ या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत होती. ‘तमाशा’ हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची कथा स्वप्न पूर्ण करणाऱ्या एका मुलावर आधारित होती.

नुकतंच इम्तियाज अली यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ या इंग्रजी वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या फिल्मी करिअर आणि वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितले. यावेळी तमाशा चित्रपटाबद्दल बोलताना इम्तियाज अली यांनी एक धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले, “हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक लोक त्यांच्याकडे आले होते आणि त्यांनी तमाशा चित्रपट पाहिल्यानंतर नोकरी सोडल्याचे मला सांगितले.”

पण मी त्यांना म्हटलं की, “हे बघा, तुम्ही निवडलेल्या प्रोफेशनमध्ये खरोखर चांगले काम करा. कारण जर तुम्ही त्यात अयशस्वी झालात तर तुम्ही मला शोधाल आणि माराल. त्यासोबत तुमच्यामुळे मी सर्व काही सोडले, असेही तेव्हा तुम्ही सांगाल”, असा सल्ला त्यांनी त्या व्यक्तींना दिला. यासोबत इम्तियाज अली यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले.

कॅमेरा पाहताक्षणी पॅन्ट खाली खेचत अभिनेत्रीने दिली बोल्ड पोज, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान रणबीर कपूरबद्दल बोलायचे झाले तर तो त्याच्या अनेक चित्रपटांमुळे चर्चेत असतो. तो लवकरच लव रंजनच्या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imtiaz ali reveals many people quit jobs after watching ranbir kapoor and deepika padukone movie know why nrp
First published on: 01-02-2022 at 18:12 IST