Shilpa Shetty-Raj Kundra’s sea-facing luxury home : अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा यांचे मुंबईत समुद्राजवळ दोन मजली घर आहे, ज्याची किंमत १०० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.

फराह खानने तिच्या नवीन यूट्यूब व्लॉगमध्ये दोघांच्या या आलिशान घराचा व्हिडीओ शेअर केला आहे, जिथून समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. त्यांच्या घराचे आतील आलिशान भाग आणि कला पाहण्यासारखी आहे. इनडोअर फाउंटन, होम जिमपासून ते लेदर लिफ्टपर्यंत सर्व काही त्यांच्या घरात उपलब्ध आहे.

पहिल्या मजल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर काळ्या रंगाने कोरलेले सोनेरी कमळ आहे. व्हरांड्यात लाकडी फरशी आणि बाजूला काचेची मोठी भिंत आहे. दरवाजाजवळ चांदीचे दोन हत्ती आहेत. त्यानंतर आत भिंतींवर अनेक प्राचीन आरसे आहेत आणि बसण्यासाठी आरामदायी व्यवस्था आहे. हॉलमध्ये फॉल सीलिंग आणि झुंबर असून, सर्वत्र लाकडी सजावट आहे.

पहिल्या मजल्यावर शिल्पा शेट्टीच्या घराचा लिव्हिंग एरिया दोन भागांत विभागला आहे. पाहुण्यांसाठी डिझायनर फर्निचर असलेला एक भाग आहे आणि कुटुंबासह बसण्यासाठी एक नारिंगी थीम असलेली जागा आहे. हे ठिकाण सोनेरी रंगाच्या भिंतींनी सजवलेले आहे.

घरात पार्ट्यांसाठी एक जागाही बनवण्यात आली आहे. तेथे बार एरियादेखील आहे. फराहने शिल्पाची मोठी होम जिमही दाखवली आहे, ज्यामध्ये वर्कआउटसाठी मशीन्स आहेत. तिच्या जिममध्ये ट्रेडमिल, पुश वर्कआउट मशिनरी आणि कार्डिओसाठी चांगली जागा आहे.

शिल्पा शेट्टीने १९९३ साली ‘बाजीगर’ या चित्रपटातून अभिनयाच्या जगात पदार्पण केले. तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

अभिनयाबरोबरच शिल्पा शेट्टीने व्यवसाय क्षेत्रातही मोठे यश मिळवले आहे. तिने स्वतःचे फिटनेस ॲप सुरू केले आहे, ज्यात योगा आणि फिटनेस टिप्स आहेत. तिने ‘द ग्रेट इंडियन डाएट’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे.