सध्या जोरदार चर्चेचा मुद्दा बनलेल्या असहिष्णुतेच्या चर्चेत बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपनेही उडी घेतली आहे. असहिष्णुता हा भारताचा अविभाज्य घटक असून, अभिव्यक्ती स्वांतत्र्याचे अस्तित्व ही केवळ कल्पनाचं आहे, असे तो म्हणाला.
अनुराग म्हणाला की, देशात नेहमीच असहिष्णुता असल्याचे दिसत आले आहे. आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यचं नाही. ते जर असेल तरचं आपण व्यवस्थित जगू शकतो आणि लढा देऊ शकतो. जे काही सध्या देशात घडत आहे ते आधीपासूनचं आहे, यात काहीचं नवीन नाही. जेव्हा अहिष्णुतेबाबत चर्चा केली जाते तेव्हा ती अधिकारांवर अवलंबून असते. अशी काही माणस आहे ज्यांनी वाटते की आपल्याला एखादी गोष्ट आवडत नाहीयं मात्र ते त्याविरुद्ध काहीचं करत नाही. पण असेही काही काहीजण आहेत ज्यांना वाटते की आपल्याला अधिकार आहेत आणि आपण काही तरी करु शकतो. आणि हाच फरक सध्या आहे जो सक्षम बनवतो.
गेल्या काही दिवसात असहिष्णुतेच्या मुद्दयावरून बरेचं वादंग निर्माण झाले आहेत. याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी काही साहित्यिकांनी आणि कलाकारांनी आपले पुरस्कार परत केले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 24th Nov 2015 रोजी प्रकाशित
असहिष्णुता हा भारताचा अविभाज्य घटक- अनुराग कश्यप
असहिष्णुता हा भारताचा अविभाज्य घटक असून, अभिव्यक्ती स्वांतत्र्याचे अस्तित्व ही केवळ कल्पनाचं आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 24-11-2015 at 13:40 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Intolerance has always been part of india anurag kashyap