हर्षवर्धन करतोय युवराज सिंगच्या एक्स गर्लफ्रेंडला डेट?

या दोघांचा मुंबईत फिरतानाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

harshvardhan rane
हर्षवर्धन राणे

‘सनम तेरी कसम’ हा २०१६ साली प्रदर्शित झालेला चित्रपट बॉक्स ऑफीसवर फारशी कमाई करू शकला नाही. पण यात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता हर्षवर्धन राणे मात्र तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला. आता हर्षवर्धन पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्याचा नुकताच व्हायरल झालेला फोटो. या फोटोमध्ये तो ‘मोहब्बतें’ फेम अभिनेत्री किम शर्मासोबत हातात हात घालून फिरताना दिसत आहे. हर्षवर्धन आणि किम शर्मामध्ये नेमकं काय शिजतंय असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे.

हर्षवर्धनच्या ‘पलटन’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान किमच्या उपस्थितीने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आता दोघांचा मुंबईत फिरतानाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Video : ही ‘पीहू’ तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल

अली पंजानी या व्यावसायिकासोबत किमने लग्न केलं होतं. पण त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. हे दोघं विभक्त झाले. क्रिकेटर युवराज सिंगसोबतही किमचं नाव जोडलं गेलं होतं. किम शर्माने ‘मोहब्बतें’, ‘नहले पे दहला’, ‘मनी है तो हनी है’, ‘कुडियों का है जमाना’, ‘जिंदगी रॉक्स’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. तर हर्षवर्धनने तेलुगू आणि हिंदी चित्रपटांत काम केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Is harshvardhan rane dating yuvraj singh ex girlfriend kim sharma

ताज्या बातम्या