बिग बॉसच्या १५ व्या पर्वाचं विजेतेपद अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला मिळालं. तर प्रतीक सहजपाल आणि करण कुंद्रा रनरअप ठरले. तेजस्वी विजेती झाल्यानंतर तिचे चाहते आनंदात असले तरीही इतर सदस्यांच्या चाहत्यांमध्येही नाराजी दिसून येत आहे. अनेकांच्या मते शमिता शेट्टी या शोची विजेती होणं अपेक्षित होतं. तेजस्वीला विजेतेपद देणं हा पक्षपात असल्याचं काहींनी म्हटलं आहे. अशात शमिता शेट्टीबाबत एका पत्रकाराचं ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्यावर शमितानं प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकार भावना सोमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘मला वाटतं शमिता शेट्टी या कारणाने बिग बॉस १५ ची विजेती होऊ शकली नाही कारण ती शिल्पा शेट्टीची बहीण आहे आणि तेजस्वी प्रकाशनं एकता कपूरची ‘नागिन’ मालिका साइन केल्यामुळे तिला बिग बॉसचं विजेतेपद देण्यात आलं. माझ्यामते चॅनेलसाठी काम करणाऱ्या कलाकारांना विजेतेपदाच्या शर्यतीत अयोग्य घोषित करायला हवं’

शमिता शेट्टीनं या ट्वीटवर लगेच प्रतिक्रिया दिली. ज्यात ती फार काही न बोलता बरंच काही बोलून गेली. तिने या ट्वीटला प्रतिक्रिया देताना लिहिलं, ‘या व्यतिरिक्त मी आणखी काय बोलू शकते… धन्यवाद. तुमच्या प्रेमसाठी आणि प्रामाणिक मतासाठी’ शमिताच्या या प्रतिक्रियेनंतर तिला विजेतेपद न मिळण्यासाठी बहीण शिल्पाला जबाबदार धरलं जात आहे. तसेच तेजस्वी आणि शमितामध्ये पक्षपात झाल्याचंही बोललं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान गौहर खान, काम्या पंजाबी आणि अनिता हसनंदानीसह इतर काही स्टार्सनी सोशल मीडियावर तेजस्वीच्या विजयावर प्रश्न उपस्थित केले. या सर्व कलाकारांनी प्रतिक हा बिग बॉसचा योग्य विजेता असल्याचे म्हटले होते. बिग बॉस 15′ च्या अंतिम सोहळ्यात तेजस्वी प्रकाशला यंदाच्या बिग बॉसची विजेती म्हणून घोषित करण्यात आले. तेजस्वी व्यतिरिक्त प्रतीक सहजपाल आणि करण कुंद्रा टॉप-3 मध्ये होते. यात प्रतीक हा फर्स्ट रनरअप तर करण कुंद्रा सेकंड रनरअप ठरला.