सलमान झाला मामा; अर्पिता खानला पुत्ररत्न

नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे खान कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Arpita Khan , Salman Khan , Bollywood, khans, salman khan family, It’s a baby boy, Entertainment news, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news
Salman Khan sister Arpita Khan : मुंबईतील हिंदुजा हेल्थकेअर रुग्णालयात अर्पिताने बाळाला जन्म दिला. बाळ आणि बाळंतीण दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आहे.

अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान हिने बुधवारी सकाळी बाळाला जन्म दिला. सलमानचा मेहुणा म्हणजेच अर्पिताचा पती आयुष शर्माने ही गोड बातमी शेअर केली आहे. मुंबईतील हिंदुजा हेल्थकेअर रुग्णालयात अर्पिताने बाळाला जन्म दिला. बाळ आणि बाळंतीण दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आहे. दरम्यान, बाळाचे नाव ‘अहिल’ ठेवण्यात आल्याचेही आयुषने सांगितले. गेल्या काही दिवसांत मलायका आणि अरबाज यांच्यातील दुराव्यामुळे खान कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे खान कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अर्पिताचे ‘बेबी शॉवर’ 

Our Prince has arrived 😃😃😃😃

A photo posted by Aayush Sharma (@aaysharma) on

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Its a baby boy for salman khan sister arpita khan

ताज्या बातम्या