‘त्या’ चित्रपटामुळे एक एक सामान विकावे लागले होते, जमिनीवर झोपायची आली होती वेळ – जॅकी श्रॉफ

कर्ज फेडण्यासाठी दोन शिफ्टमध्ये काम करायचे जॅकी श्रॉफ.

jackie shroff opens up on going bankrupt after boom failed on box office
जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या मुलांना काही ही समजू दिले नव्हते.

बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. जॅकी श्रॉफ नेहमीच गोष्टी स्पष्टपणे बोलताना दिसतात. दरम्यान, एका मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या कुटुंबाला होणार्‍या आर्थिक संकटाविषयी सांगितले. जॅकी यांचा ‘बूम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ही घटना घडली होती. अगदी त्यांना त्याचे घर विकावे लागले आणि कर्ज फेडण्यासाठी दोन शिफ्टमध्ये काम करावे लागले होते.

‘बूम’ हा चित्रपट २००३मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जॅकी यांच्या व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, गुलशन ग्रोवर, जीनत अमान, कतरीना कैफ सारखे अनेक कलाकार होते. या चित्रपटाची निर्मिती ही आयशा श्रॉफ यांनी केली होती. यापूर्वी टायगर देखील या चित्रपटाच्या अपयशा बद्दल बोलला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu)

आणखी वाचा : टायगर आणि दिशाच्या रिलेशनशीपवर जॅकी श्रॉफ यांचे वक्तव्य, म्हणाले…

या चित्रपटाच्या अपयशानंतर काय झालं या बद्दल सांगत जॅकी म्हणाले, “मला माहित आहे की आम्ही काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आम्ही काही तरी गमावलं. जर मला त्यांचे पैसे द्यायचे आहेत तर मी देईन. मी जेवढं जास्त काम करू शकतो तेवढे काम मी केलं आणि आम्ही सगळ्यांचे पैसे दिले, जेणेकरून आमच्या कुटुंबाचं नाव खराब होणार नाही.”

आणखी वाचा : ‘या’ अभिनेत्रीवर होता चोरीचा आरोप, घर मालकीणीने देखील दाखवला होता बाहेरचा रस्ता

जॅकी पुढे म्हणाले, “कोणता ही व्यवसाय असेल त्यात नेहमीच चढ-उतार येत असतात, आपण नेहमीच सगळ्यात पुढे राहू शकत नाही. कधी वर तर कधी खाली, पण आपले आचारविचार कसे टिकवायचे हे आपल्याला माहित असलेच पाहिजे. मी आणि आयशाने टायगर आणि कृष्णावर आमच्या आर्थिक अडचणींचा परिणाम होऊ दिला नाही. माझ्या मुलांना काहीही समजले नाही. ते खूप लहान होते.”

आणखी वाचा :  इंडियन आयडल १२ : ‘या’ दोन गायकांना हिमेश रेशमीयाने दिली म्युझिक अल्बममध्ये संधी

जून २०२० मध्ये टायगरने ‘बूम’ या चित्रपटाच्या अपयशाबद्दल आणि त्याच्या कुटुंबावर त्याचा कसा परिणाम झाला याबद्दल सांगितले होते. टायगर म्हणाला, “आमचं फर्निचर एकामागून एक विकले गेले होते. ज्या गोष्टी पाहत मी मोठा झालो होतो त्या हळू अदृश्य होऊ लागल्या. मग शेवटी माझा बेड पण गेला आणि मी जमिनीवर झोपायला लागलो. माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव होता.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jackie shroff opens up on going bankrupt after boom failed on box office dcp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या