ईडीसमोर चौकशीसाठी जॅकलिन फर्नांडिस चौथ्यांदा गैरहजर, नोव्हेंबरमध्ये चौकशी करण्याची विनंती

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिस ईडीच्या रडारवर आहे.

Jacqueline-Fernandez 1810
(file Photo)

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चर्चेत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिस ईडीच्या रडारवर सापडल्याने या चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान २०० कोटी रुपयांच्या मनी लॉऩ्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी जॅकलीन चौथ्यांदा गैरहजर राहिली आहे. सोमवारी १८ ऑक्टोबरला जॅकलिनला या प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर व्हायचं होतं. मात्र जॅकलिन हजर राहू शकली नाही. या पूर्वी १६ ऑक्टोबरलादेखील जॅकलिन चौकशीसाठी हजर राहिली नाही.

गेल्या चार दिवसात जॅकलिनला ३ वेळा ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र या तिनही दिवशी ती ईडी कार्यालयात उपस्थित राहिली नाही. तसचं याआधी २५ सप्टेंबरलादेखील समन्स बजावूनही जॅकलिन चौकशीसाठी उपस्थित राहिली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार जॅकलिनने खासगी कारणांमुळे उपस्थित राहू शकत नसल्याचं सांगितलं आहे. तसंच तिने शुक्रवारी ईडीच्या अधिकाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत चौकशी पुढे ढकलावी अशी विनंती केल्याचं वृत्त आहे.

‘या’ व्यक्तीची समांथाला वाटते भिती; व्हिडीओ शेअर करत म्हणाली “तू इथे नसतानाही मी तुला घाबरते”

प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलं का?, आता दिसते खूपच बोल्ड

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तिहार कारागृहातून २०० कोटी रुपये वसूल करणारा सुकेश चंद्रशेखर स्वत:ची खरी ओळख न सांगता जॅकलिनला फोन करत असे. तो स्पूफिंगद्वारे तिहार जेलमधून जॅकलिनला फोन करत असल्याचे म्हटले जात आहे. त्याने जॅकलिनला काही महागाड्या भेटवस्तू देखील गिफ्ट म्हणून पाठवल्या होत्या. पण चौकशीदरम्यान जॅकलिनने तिला भेटवस्तू पाठवणारी आणि फोन करणारी व्यक्ती जेलमध्ये असल्याची तिला कल्पना देखील नव्हती’, असे जॅकलिन म्हणाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jacqueline fernandez not present for ed questioning fourth time in 200 crore extortion case kpw

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या