हॉलिवूड लोकप्रिय अभिनेता जेम्‍स बॉण्‍डचा ‘नो टाइम टू डाय’ चित्रपट अखेर गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. जगभरात लाखो चाहते असलेल्या या फ्रेंतायझीच्या २५ व्या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. एवढ्यातच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक नवा रेकॉर्ड केला आहे.

चित्रपट समीक्षकांनी देखील चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे आणि त्यासोबतच फ्रँचायझी डॅनियल क्रेगचा बेस्ट फेअरवेल असा सर्वोत्तम चित्रपट असल्‍याचे मानत आहेत. दरम्यान, महाराष्‍ट्रातील चित्रपटप्रेमींसाठी अखेर प्रतिक्षाकाळ संपला आहे, कारण चित्रपट आता २२ ऑक्‍टोबर रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्‍ये प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : जात लपवण्यासाठीच वडिलांनी स्वीकारलं ‘बच्चन’आडनाव, अमिताभ यांचा खुलासा

चित्रपटाचे दिग्‍दर्शक कॅरी फुकुनगाबाबत बोलताना डॅनियल क्रेग म्‍हणाले, ”जे अनेक चित्रपटांच्‍या बाबतीत घडले आहे, त्यावर आम्ही चर्चा केली. जेम्स बॉण्‍ड अभिनीत चित्रपट नेहमीच प्रकाशझोतात राहिले आहेत. हे नेहमीच प्रशंसनीय राहिलं आहे. ते दूरदृष्‍टी असलेल्‍या दिग्‍दर्शकांपैकी एक आहेत आणि त्‍यांची व्हिज्‍युअल शैली अत्‍यंत प्रबळ आहे.

आणखी वाचा : ‘एवढं मोठ घर काय कामाचं आहे…’, हातातील कॉफी मगमुळे करीना झाली ट्रोल

पुढे ते म्हणाले, “चित्रपट बनवण्‍यासाठी यासारख्‍याच क्षमतापूर्ण व्‍यक्‍तीची गरज असते. ही मोठी गोष्ट आहे. प्रबळ चित्रपटनिर्मिती शैली व चित्रपट निर्माण करण्‍याबाबत माहिती असलेली व्‍यक्‍ती महत्त्वाची असते, कारण कथानकामध्‍ये सातत्‍यता राखावी लागते, तसेच त्‍यामधून योग्‍य लुक्‍स व हावभाव देखील दाखवावे लागतात. प्रेक्षक कधीच बोलत नाही की ‘थांबा, काय चालू आहे? कॅरी हा तरूण आहे आणि त्‍याच्‍यामध्‍ये खूप उत्साह आहे. शूटिंगला सात महिने उलटले आहेत, तरीदेखील त्‍याचा उत्‍साह तसाच आहे. त्‍याची सोबत लाभणे हे आमचे नशीब आहे. तसेच तो लेखक देखील आहे, जे आमच्‍यासाठी महत्त्वाचे होते, कारण आम्‍ही अशा टप्‍प्‍यावर होतो, जेथे पटकथा लेखनासंदर्भात वेळ निघून जात होती.”