टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीनला ‘बिग बॉस १४’मधून बरीच लोकप्रियता मिळाली. या रिअलिटी शोनंतर तिचा चाहत्यांमध्येही बरीच वाढ झाली. शोमध्ये प्रेक्षकांनीही तिला भरभरून प्रेम दिलं. एवढंच नाही तर या शोमधून बाहेर पडल्यानंतरही जास्मिनला बरेच प्रोजेक्ट्स मिळाले. आज जास्मिनने प्रेक्षक आणि चाहत्यांमध्येच नाही तर टीव्ही जगतातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने खळबळजनक खुलासा केला आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिला सतत बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या असं तिनं म्हटलंय.

जास्मिन भसीन २०२०-२१ मध्ये ‘बिग बॉस १४’मध्ये दिसली होती. या शोमध्ये असताना ती अली गोनीच्या प्रेमात पडली. या दोघांच्या लव्ह स्टोरीची चर्चा बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेरही झाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जास्मिनने बिग बॉसच्या घरातील अनुभव आणि या शोमुळे तिच्यावर मानसिकरित्या काय प्रभाव पडला याविषयी भाष्य केलं.
आणखी वाचा- भारतासह परदेशातही ‘लाल सिंग चड्ढा’ ठरला अपयशी, चित्रपटाने केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई

बिग बॉस १४ बद्दल बोलताना जास्मिन म्हणाली, “या शोमधून बाहेर पडल्यानंतर मला खूप मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग आणि आक्षेपार्ह भाषेतील कमेंट्सचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर मला सोशल मीडियावर रोज बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर लोकांनी माझ्यावर आक्षेपार्ह भाषेत कमेंट्स केल्या. हे सर्व कशासाठी तर मी एका शोमध्ये सहभागी झाले आणि त्यांना ही गोष्ट अजिबात आवडली नाही म्हणून मला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं गेलं.”

आणखी वाचा- Photos : ‘बिग बॉस १६’व्या पर्वासाठी सलमान खान घेणार तिप्पट पैसे?, मानधनाचा आकडा वाचून थक्क व्हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जास्मिन पुढे म्हणाली, “बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर मी ज्या गोष्टींचा सामना केला त्या खूप गंभीर होत्या. त्यामुळे माझ्यावर मानसिकरित्या बराच प्रभाव पडला. अर्थात या सगळ्यात माझे कुटुंबीय, मित्रपरिवाराची साथ मिळाली पण यासोबतच या सर्व गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी मला डॉक्टरांची मदत घ्यावी लागली. आता मला या सर्व गोष्टींची एवढी सवय झाली आहे की माझ्यावर कोण काय टीका करतं याचा मला फरक पडत नाही. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकले आहे.”