John Abraham House : बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या त्याच्या ‘द डिप्लोमॅट’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. जॉन अब्राहम अनेक वर्षांपासून त्याच्या चित्रपट, फिटनेसमधून व अॅक्शन अवतारांतून लोकांचे मनोरंजन करीत आहे. त्यामुळेच आज तो एका लॅव्हिश लाईफचा मालक बनला आहे.
मुंबईतील पॉश भागात या अभिनेत्याची खूप मोठ्या प्रमाणात मालमत्ता आहे आणि त्याने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस चालवण्याबरोबरच विविध व्यवसायिक उपक्रमांमध्ये गुंतवणूक केली आहे. चला जॉनच्या मालमत्तेवर एक नजर टाकूया, ज्याने आता त्याची एकूण संपत्ती २५१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचवली असल्याचे वृत्त आहे.
जॉनचे वांद्र्यातील डुप्लेक्स पेंटहाऊस ६० कोटींचे
जॉन अब्राहमचे मुंबईतील पॉश वांद्रे वेस्ट येथे सी-फेसिंग डुप्लेक्स पेंटहाऊस आहे. ते त्याचे मुख्य निवासस्थान आहे. व्हिला इन द स्काय नावाचे हे अपार्टमेंट एका निवासी संकुलाच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावर आहे. ते जॉनचा भाऊ अॅलन अब्राहमने डिझाइन केले होते. एशियन पेंट्सला दिलेल्या जुन्या मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले होते की, त्याच्या घराला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरल डिझाइनने सर्वोत्तम घर म्हणून निवडले आहे.
जमिनीपासून छतापर्यंत असलेल्या काचेच्या भिंती हे या घराचे सर्वांत आकर्षक वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे अरबी समुद्राचे अखंड दृश्य, तसेच माउंट मेरी हिल येथील सुंदर दृश्ये दिसतात. घरात एक लाकडी डेकदेखील आहे. जॉनने त्याच्या ६० कोटी रुपयांच्या पेंटहाऊसला ‘बेसिक’ म्हटले. कारण त्याने घराचा लिव्हिंग रूम एरिया दाखविला होता, जो आलिशान सोफा आणि लाकडी फर्निचर यांनी सुसज्ज होता. अभिनेत्याने त्याच्या डुप्लेक्स अपार्टमेंटचे दोन्ही मजले लाकडी जिन्याने जोडले आहेत.

एका खोलीएवढी मोठी जिम आणि ओपन टेरेस
जॉनने त्याच्या घराचा दुसरा मजला त्याच्या मोठ्या जिमसाठी राखीव ठेवला आहे. हा अभिनेता फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जातो आणि जिम सर्व आधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. जॉनची ओपन टेरेस भरपूर झाडांनी सजवलेली आहे आणि टेरेस गार्डनसारखा दिसते. येथून अरबी समुद्राचे विहंगम असे सुंदर दृश्यदेखील दिसते.

लिंकिंग रोडवरील जॉनचा बंगला
या अपार्टमेंटव्यतिरिक्त जॉनने ७०.८३ कोटी रुपये खर्च करून एक बंगलादेखील खरेदी केला. हा बंगला मुंबईतील खार परिसरातील लिंकिंग रोडवर आहे. अभिनेत्याने केवळ ५,४१६ चौरस फुटांचा बंगलाच खरेदी केला नाही, तर त्याने बंगला असलेल्या जागेवरील ७,७२२ चौरस फूट जमीनदेखील खरेदी केली आहे.
जॉनला ४.३ कोटी रुपये भाडं मिळतं
जून २०२५ मध्ये जॉनने तीन आलिशान अपार्टमेंट भाड्याने घेतली, ज्याचे मासिक भाडे ६.३० लाख रुपये होते. इकॉनॉमिक टाइम्सच्या मते, तो पाच वर्षांच्या भाडेपट्ट्याच्या कालावधीत दाखल झाला आणि भाड्यात वार्षिक आठ टक्के वाढ झाल्याने, अभिनेता मुंबईतील त्याच्या तीन मालमत्ता भाड्याने देऊन ४.३ कोटी रुपये कमवेल. या मालमत्ता बँडस्टँडवरील एक प्रमुख निवासी क्षेत्र असलेल्या सी ग्लिम्प्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आहेत.

जॉनची लंडन आणि लॉस एंजेलिसमधील मालमत्ता
GQ नुसार, जॉनची फक्त मुंबईतच मालमत्ता नाही, तर त्याच्याकडे लॉस एंजेलिस आणि सेंट्रल लंडन, यूके येथेही रिअल इस्टेट आहे. वेबसाइटनुसार, लॉस एंजेलिसच्या बेल एअर परिसरात त्याची एक भव्य मालमत्ता आहे – जिथे जेनिफर अॅनिस्टन व अँजेलिना जोली यांसारख्या हॉलीवूड स्टार राहतात. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अभिनेत्याकडे सेंट्रल लंडनच्या एका पॉश परिसरात एक मालमत्तादेखील आहे, जी तो त्याच्या प्रॉडक्शन हाऊससाठी परदेशी मुख्यालय म्हणून वापरतो.
जॉनचे व्यवसाय आणि गुंतवणूक
जॉनची जे. ए. एंटरटेन्मेंट नावाची एक निर्मिती कंपनी आहे. या कंपनीने आयुष्मान खुराना आणि यामी गौतम यांसारख्या कलाकारांना ‘विकी डोनर’ या अभूतपूर्व चित्रपटात लाँच केले. जॉन प्रामुख्याने स्वतःचे चित्रपट तयार करतो. त्याच्या निर्मिती संस्थेने ‘मद्रास कॅफे’, ‘परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण’, अटॅक, बाटला हाऊस, वेदा व त्याचा सर्वांत अलीकडील रिलीज झालेल्या ‘द डिप्लोमॅट’ यांसारख्या चित्रपटांना पाठिंबा दिला आहे.
जॉन हा इंडियन सुपर लीग (ISL)मध्ये भाग घेणाऱ्या नॉर्थईस्ट युनायटेड एफसी या फुटबॉल क्लबचा सह-मालक आहे. जॉनव्यतिरिक्त जया बच्चनदेखील या संघाच्या सह-मालक आहेत. जॉनची पत्नी प्रिया रुंचल या क्लबची अध्यक्ष आहे. हा फुटबॉल क्लब ईशान्य भारतातील आठ राज्यांचे प्रतिनिधित्व करतो.
फुटबॉल आणि जिमिंगव्यतिरिक्त जॉनला बाईक आणि रेसिंगची आवड आहे. त्याने त्याची आवड जोपासली आणि जे. ए. रेसिंगने गोवा एसेस ही रेसिंग टीम विकत घेतली. या टीमने २०२४ मध्ये इंडियन रेसिंग फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला होता.
जेए फिटनेस
फिटनेस ही जॉन अब्राहमची आवड आहे. अभिनेता जेए फिटनेस नावाच्या जिमचा मालक आहे. जॉनचा जिम ब्रँड परवडणाऱ्या; पण उच्च दर्जाच्या फिटनेस सुविधा प्रदान करतो.
जॉन अब्राहमची गुंतवणूक
जॉन आइस्क्रीम ब्रँड NOTO मध्ये सुरुवातीचा गुंतवणूकदार होता, ज्याचा उद्देश निरोगी, कमी कॅलरीज असलेले आइस्क्रीम वितरित करणे आहे. सबको कॉफी रोस्टर्स हा एक ब्रँड आहे, जो वेगाने लोकप्रिय होत आहे. या अभिनेत्याने २०२४ मध्ये या ब्रँडमध्ये गुंतवणूक केली. गौरी खान आणि निखिल कामथसारखी इतर प्रसिद्ध नावेदेखील प्रीमियम कॉफी आणि कोको ब्रँडमध्ये गुंतवणूकदार आहेत.