jolly llb 3 box office collection day 13 : दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्या कोर्टरूम ड्रामा ‘जॉली एलएलबी ३’ ला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले आहे. बॉलीवूडमधील दोन सर्वांत प्रतिभावान अभिनेते, अक्षय कुमार व अर्शद वारसी यांनी त्यांच्या विनोद आणि अभिनयाने प्रेक्षकांचे मने जिंकली आहेत. ‘जॉली एलएलबी ३’ १९ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन १३ दिवस झाले आहेत. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईवर एक नजर टाकूया.

‘जॉली एलएलबी ३’ला समीक्षकांकडून खूप कौतुकास्पद प्रतिसाद मिळाला आहे. अक्षय कुमार आणि अर्शद कुमार यांची जोडी उत्तम आहे. सौरभ शुक्लादेखील न्यायाधीश त्रिपाठीच्या भूमिकेत दमदार पुनरागमन करीत आहेत. ‘जॉली एलएलबी ३’ पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १२.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आता त्याच्या १३ व्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत.

‘जॉली एलएलबी ३’ ने १०० कोटींचा टप्पा ओलांडला

सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, बुधवारी म्हणजे १३ व्या ‘जॉली एलएलबी ३’ने ३.८५ कोटींची कमाई केली, ज्यामुळे त्याचे एकूण कलेक्शन १००.८५ कोटींवर पोहोचले. चित्रपटाने आठवड्याच्या शेवटीही चांगली कामगिरी केली, याचा अर्थ असा की, त्याचे बजेट वसूल करण्यासाठी कमी वेळ लागला. ‘जॉली एलएलबी ३’चे बजेट १२० कोटी होते, जे जगभरातील कमाईतून वसूल करण्यात आले आहे.

‘जॉली एलएलबी ३’ने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात ७४ कोटी कमावले आणि दुसऱ्या आठवड्यातही त्याने जोरदार कलेक्शन केले आहे. आठवड्याच्या शेवटी त्याने ६ ते ७ कोटी कमावले, तर आठवड्याच्या सुरुवातीला त्याने ३ ते ४ कोटी कमावले.

अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘जॉली एलएलबी ३’ने अक्षय कुमार व अर्शद वारसी यांना पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळवून दिली आहे. त्यांच्या जोडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे, हे त्याच्या कलेक्शनवरून दिसून येते. लोकांना कोर्टरूम ड्रामा पाहणे आवडते म्हणूनच चित्रपटाने खूप कमाई केली.

२ ऑक्टोबर रोजी अनेक मोठे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहेत, ज्यात ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा चॅप्टर १’ आणि वरुण धवनचा ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ यांचा समावेश आहे. ‘कांतारा’ने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे, ज्यामुळे इतर चित्रपटांना त्याच्याशी स्पर्धा करणे कठीण झाले आहे.