Jolly LLB 3 OTT Release : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा बहुप्रतिक्षित ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. सुभाष कपूर दिग्दर्शित, अक्षय कुमार आणि अर्शद वारसी अभिनीत या कोर्टरूम ड्रामाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

अक्षय आणि अर्शदच्या अभिनयालाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असला तरी अनेक चाहते आता त्याच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आठ आठवड्यांनंतरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित होतो. ‘ईटी’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपट १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र, निर्मात्यांनी चित्रपटाच्या ओटीटी रिलीज तारखेबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट नेटफ्लिक्स किंवा जिओ सिनेमा यापैकी एका प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. ‘जॉली एलएलबी’ आणि जॉली एलएलबी २’ हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. तुम्ही हे दोन्ही चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.

सोशल मीडियावर चित्रपटाचं प्रचंड कौतुक होत आहे. ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटाचं दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलं आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, अर्शद वारसी, सौरभ शुक्ला, गजराज राव, अमृता राव, सीमा बिस्वास, हुमा कुरेशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, ‘जॉली एलएलबी ३’ ने १२ व्या दिवशी ३.७५ कोटी रुपये कमावले, तर ११ व्या दिवशी २.७५ कोटी रुपये कमावले. अशाप्रकारे देशभरात आतापर्यंत त्याने ९७ कोटी रुपये कमावले आहेत आणि १०० कोटी रुपयांच्या कमाईपासून काही पावले दूर आहेत. १२० कोटी रुपयांचे बजेट असूनही या चित्रपटाने जगभरात १३९ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट आता अक्षयचा चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे, जो ‘केसरी चॅप्टर २’ च्या कलेक्शनला मागे टाकत आहे. २ ऑक्टोबरला आणखी दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ज्यामुळे स्पर्धा आणखी वाढेल. या शुक्रवारपर्यंत ‘जॉली एलएलबी ३’ १०० कोटींचा आकडा गाठेल अशी अपेक्षा आहे.