वरूण- नताशाचा ब्रेकअप?

बी-टाऊन पार्ट्यांनाही नताशा वरुणसोबत हजेरी लावायची.

Varun Dhawan, Natasha Dalal
वरूण धवन, नताशा दलाल
बॉलिवूड कपल्सचे रिलेशनशीप आणि त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा नेहमीच रंगतात. २०१७ हे वर्ष संपत असताना आता आणखी एका प्रसिद्ध जोडीच्या ब्रेकअपची माहिती समोर येत आहे. अभिनेता वरूण धवन आणि त्याची प्रेयसी नताशा दलाल यांच्या नात्यात दुरावा आला असून दोघांनीही ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ‘बॉलिवूड लाइफ’ या वेबसाइटने दिली आहे.

‘स्टुडण्ट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या वरुण धवनच्या चाहत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याच्या महिला चाहत्यांविषयी वेगळं काही सांगण्याची गरजच नाहीये. अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला वरुण बऱ्याच वर्षांपासून नताशा दलालसोबत रिलेशनशिपमध्ये होता. विविध कार्यक्रमांना, बी-टाऊन पार्ट्यांनाही नताशा वरुणसोबत हजेरी लावायची. त्यामुळे त्यांचं नातं कोणापासूनही लपलेलं नव्हतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वरूणला बऱ्याच कार्यक्रमांमध्ये एकटंच पाहिलं गेलंय. दिवाळी पार्ट्यांमध्येही वरूणसोबत नताशा उपस्थित होती.

PHOTOS : शाहिद-मीराचा पहिला फोटोशूट

‘जुडवा २’ या चित्रपटाच्या यशानंतर वरूणच्या करिअरला एक कलाटणी मिळाली आहे. त्यामुळे वरूण करिअरकडे अधिक लक्ष देत असल्याने नताशाकडे दुर्लक्ष झाल्याचं म्हटलं जात आहे. ‘बॉलिवूड लाइफ’च्या माहितीनुसार वरूण आता नताशाला वेळ देऊ शकत नाही. भेट न झाल्यानेच दोघांमध्ये छोटेमोठे वाद होऊ लागले. दोघेही लग्नाचा विचार करत असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता ब्रेकअपमुळे त्यांच्या नात्याचं भविष्य अंधारात असल्याचं दिसून येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Judwaa 2 actor varun dhawan break up with girlfriend natasha dalal