कॅनेडियन पॉपस्टार जस्टीन बीबरचे जगभरात लाखो चाहते आहेत. जस्टीन बीबरच्या नावे अनेक हिट गाणी, ग्रॅमी अवॉर्ड आणि अमेरिकन म्युझिक अवॉर्डची नोंद करण्यात आली आहे. जस्टीन बीबरच्या भारतातील चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात जस्टीन बीबर हा भारतात परफॉर्म करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या १८ ऑक्टोबरला दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर त्याचा हा कार्यक्रम होणार आहे.

यापूर्वीही २०१७ मध्ये जस्टीन बीबरने भारतात लाइव्ह कॉन्सर्ट केले होते. यावेळी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडिअमध्ये लाइव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी आलिया भट्ट, बिपाशा बासू, हुमा कुरेशी, सोफी चौधरी, कनिका कपूर, भूमी पेडणेकर, अयान मुखर्जी, पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिससह अनेक सेलिब्रिटी कॉन्सर्टला हजेरी लावली होती. यानंतर आता येत्या ऑक्टोबर महिन्यात दिल्लीत त्याचं हे कॉन्सर्ट होणार आहे.

या कॉन्सर्टच्या तिकीट विक्रीला ४ जूनपासून सुरुवात होणार आहे. BookMyShow वर ही तिकीट उपलब्ध असणार आहेत. या कॉन्सर्टची घोषणा झाल्यानंतरच तिकिटांची नोंदणी सुरु झाली आहे. अनेक लोक आगाऊ तिकीट खरेदी करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जस्टीस वर्ल्ड टूर’दरम्यान जस्टीन बीबर हा जगभरातील ४० देशांमध्ये जवळपास १२५ हून अधिक शो करणार आहे. मे २०२२ ते मार्च २०२३ या दरम्यान वर्ल्ड टूर असणार आहे. आतापर्यंत या वर्ल्ड टूरमधील कॉन्सर्टची जवळपास १३ लाख तिकीटे विकण्यात आल्याचे सांगितले जात आहे. जस्टीन बीबरचा हा कॉन्सर्ट २०२० मध्ये होणार होता. मात्र करोनामुळे त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली.