कोरियन के–पॉप बँडच्या चाहत्यांना आणखी एक धक्का बसला आहे. के-पॉप स्टार गायक मूनबिन याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या करत जीवन संपवले होते. ही घटना ताजी असतानाच आता के-पॉप स्टार आणि प्रसिद्ध कोरियन गायिका हेसू हिने आत्महत्या केली आहे. एका हॉटेलमध्ये हेसूचा मृतदेह संशयास्पदरित्या सापडला. तिच्या निधनामुळे जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध कोरियन गायिका हेसूचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र ती त्या कार्यक्रमासाठी आली नाही. त्यानंतर आयोजिकांनी ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांची तपास केला असता शनिवारी १३ मे रोजी हेसूचा मृतदेह एका हॉटेलच्या रुममध्ये आढळून आला.

आणखी वाचा : “माझे बाबा मला सोडून गेले तेव्हा…” सखी गोखलेने सांगितला ‘तो’ भावूक अनुभव, म्हणाली “मी आजही…”

यावेळी तिच्या रुममधून सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांकडून प्रथमदर्शनी हेसूने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच हेसूने वयाच्या २९ व्या वर्षी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आणखी वाचा : Video : “याला म्हणतात संस्कार”, रितेश-जिनिलीयाच्या मुलांनी जिंकलेले गोल्ड मेडल गळ्यातून काढले अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेसू ही दक्षिण कोरियातील एक लोकप्रिय गायक होती. ती अेक कार्यक्रम करायची. दक्षिण कोरियामध्ये तिचा मोठा चाहता वर्ग होता. हेसूच्या मृत्यूने तिचे चाहते आणि अनेक कलाकारांना धक्का बसला आहे. हेसूचा जन्म १९९३ मध्ये झाला. तिने २०१९ मध्ये करिअरला सुरुवात केली. ‘My Life, Me’ असे तिच्या पहिल्या अल्बमचे नाव होते. पण ‘The Trot Show’ मुळे ती सर्वाधिक लोकप्रिय झाली.