काजोल-अजय देवगण यांच्या जुहू येथील बंगल्यातून सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदविण्यात आली आहे. अजय देवगणच्या घरात चोरी होण्याची ही दुसरी घटना आहे.
२२ ऑक्टोबरला करवा चौथच्या दिवशी काजोल तयारी करत होती. यावेळी आपला कपाटातील ज्वेलरी बॉक्समधील बांगड्या चोरीला गेल्याचे तिला आढळून आले. सोन्याच्या एकूण १७ बांगड्या चोरल्याची तक्रार जुहू पोलिसात तिने केली आहे. किमान पाच लाख किंमतीच्या या सोन्याच्या बांगड्या असल्याचा अंदाज आहे. तसेच, यामागे घरातील कोणीतरी जबाबदार असल्याचा संशय पोलिसांना आहे. या चोरीबाबत अजय किंवा काजोल यांच्याकडून काहीही माहिती आली नसली तरी पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबतची तक्रार आली आहे. शिवाय काजोलची आई तनुजानेही सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Oct 2013 रोजी प्रकाशित
काजोलच्या १७ सोन्याच्या बांगड्या चोरल्या
काजोल-अजय देवगण यांच्या जुहू येथील बंगल्यातून सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदविण्यात आली आहे.
First published on: 25-10-2013 at 01:00 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kajol karva chauth ruined by theft of 17 gold bangles