Yug Devgan Durga Puja Celebrations Video Viral : काजोल आणि मुखर्जी परिवार दरवर्षी नवरात्री उत्सव साजरा करतात. या उत्सवासाठी अनेक अभिनेत्री आणि बॉलीवूड कलाकार एकत्र येतात. अशातच या नवरात्री उत्सवातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत काजोलच्या मुलाला पुजाऱ्यांनी सर्वांसमोर उठवलं आहे.
या काळात सर्वांचे लक्ष काजोलपेक्षा मुलगा युगवर जास्त केंद्रित होते. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत काजोलचा मुलगा युग देवीसमोर मांडी घालून बसल्याचे दिसत आहे. बाजूला त्याची आई काजोल बसल्याचेही दिसते. इतक्यात पुजारी तिथे येतात. सर्वांसमोर हाताला धरून पुजारी त्याला उठवतात. काजोलचा मुलगा युग आधी उठायला नकार देतो; पण पुजारी त्याला जबरदस्तीने सर्वांसमोर उठवतात. त्यानंतर ते युगच्या हातात माईक देतात. ‘दुर्गा माँ की जय’, असं या व्हिडीओमध्ये युग म्हणताना दिसत आहे. त्यानंतर सर्व जण टाळ्या वाजवतात.
युग खूप लाजाळू आहे आणि क्वचितच तो सार्वजनिक ठिकाणी बोलतो. अलीकडेच जेव्हा त्याला पापाराझींनी पाहिले तेव्हा तो घाबरला आणि त्याने फोटो काढण्यास नकार दिला. दरवर्षीप्रमाणे, काजोलने तिचा मुलगा युग देवगणबरोबर दुर्गा पूजा साजरी केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये युग त्याची आई काजोलला मिठी मारतो आणि नंतर तिच्या कानात काहीतरी कुजबुजतो. हे पाहून काजोल त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करते. युगबद्दल बोलायचे झाले तर, तो सध्या शिक्षण घेत आहे आणि व्हॉइस-ओव्हर कलाकारदेखील बनला आहे. त्याने “कराटे किड : लेजेंड्स” चित्रपटात ली फोंगच्या भूमिकेला आवाज दिला आहे. युग सध्या १५ वर्षांचा आहे. काजोल आणि अजय देवगण यांना युग आणि निसा ही दोन मुलं आहेत.
जेव्हा बॉलीवूडच्या लोकप्रिय कपल्सची चर्चा रंगते तेव्हा सर्वांत आधी अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांचं नाव समोर येतं. काजोल आणि अजय यांच्या लग्नाला २६ वर्षं झाली आहेत; पण आजही दोघांमधील प्रेम कमी झालेलं नाही. अनेक ठिकाणी दोघे एकत्र दिसतात.