Kajol Durga Puja Video Viral : काजोलने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मोठ्या उत्साहात दुर्गा पूजा साजरी केली. काल (२ ऑक्टोबर) विजयादशमीनिमित्त ती दुर्गा पूजा मंडपामध्ये दिसली. दुर्गा पूजेमध्ये काजोल, राणीसह संपूर्ण मुखर्जी कुटुंबाची चर्चा झाली.
काजोल आणि राणी मुखर्जी यांच्यासह जया बच्चन आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी दुर्गा पूजा उत्सवात भाग घेतला होता. या कार्यक्रमातील अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
काजोल आणि तिच्या बहिणींच्या लूकचीदेखील बरीच चर्चा झाली. दुर्गा पूजा मंडपामधील काजोलचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, चाहते त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.
काजोलच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेत्री काजोल गर्दीतून पायऱ्या उतरत आहे. यादरम्यान, एक व्यक्ती काजोलचा हात धरते अन् तिला वर खेचते. अचानक हात धरून मागे खेचल्याने काजोलही आर्श्चयचकित होते. नेमकं काय घडतंय तिला समजत नसल्याचं व्हिडीओमधून दिसून येतंय. त्यानं तिला अचानक ज्या पद्धतीनं तिला स्पर्श केला, त्यामुळे ती घाबरली. काजोल आश्चर्यचकित झाली आणि त्याच्याकडे रागानं पाहिलं. दरम्यान, सदर व्यक्ती काजोलचा बॉडीगार्ड असल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्या.
व्हायरल व्हिडीओवर एका नेटकऱ्याने लिहिले, “त्याने तिला खरोखरच वाईटरीत्या स्पर्श केला”, दुसऱ्याने लिहिले, “हे खूप चुकीचे आहे.”, तिसऱ्याने लिहिले, ” हे खूप वाईट आहे, हे सर्व प्रकार चुकीचे आहेत.”
दुर्गा पूजा मंडपामध्ये अनेक सेलिब्रेटी दर्शनसाठी येत असतात. जया बच्चन, सुमोना चक्रवर्ती, प्रियांका चोप्रा, रूपाली गांगुली, आलिया भट्ट यांसारखे अनेक सेलिब्रेटी मंडपामध्ये येऊन गेले. काजोलने सर्वांबरोबर फोटो काढले.
काजोल सध्या तिच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या टॉक शोमध्ये व्यग्र आहे. हा शो २५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि दर गुरुवारी नवीन भाग प्रदर्शित होत आिहे. काजोल पुढे ‘द ट्रायल : प्यार कानून धोखा’ सीझन २ आणि प्रभू देवाच्या आगामी चित्रपट ‘महारानी : क्वीन ऑफ क्वीन्स’मध्ये दिसणार आहे.