मध्यंतरी आलेल्या ‘विक्रम’ या चित्रपटामुळे दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन पुन्हा एकदा चर्चेत आले. यानंतर महानायक अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि अभिनेता प्रभास यांच्या ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाचा भाग होत असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. याबरोबरच तमिळ ‘बिग बॉस’च्या आगामी सीझनमुळेही ते सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

कमल यांनी नुकतंच चेन्नईतील एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. याच कार्यक्रमात त्यांनी तरूणांशी गप्पा मारल्या तसेच आपल्या तरुण वयात आलेल्या अडचणी तसेच करियर घडवतानाचा संघर्ष याविषयीही त्यांनी भाष्य केलं आहे. याचदरम्यान विद्यार्थ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्येचा विषय निघाला अन् कमल हासन यांनी एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला.

आणखी वाचा : ‘द व्हॅक्सिन वॉर’वर प्रतिक्रिया देण्यास अदा शर्माने दिला नकार; अभिनेत्रीने सांगितलं यामागील कारण

या विषयावर बोलताना कमल यांनी त्यांच्या तरुणवयात त्यांना आलेल्या डिप्रेशनबद्दल तसेच आत्महत्येच्या विचारांबद्दल भाष्य केलं आहे. कमल हासन म्हणाले, “२० किंवा २१ व्या वर्षी माझ्याही डोक्यात आत्महत्येचा विचार येऊन गेला आहे. चित्रपटसृष्टी आणि कलाविश्व दोन्ही ठिकाणी मी जे काम करत होतो त्याची दखल घेतली जात नव्हती. त्यावेळी माझ्या डोक्यात स्वतःला संपवण्याचा विचार आला. मी माझ्या मार्गदर्शकांशी याबद्दल चर्चा केली. त्यांनी मला सातत्याने काम करत राहण्याचा आणि आपली वेळ कधी येते याची वाट पाहण्याचा मोलाचा सल्ला दिला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले, “मृत्यू हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे ही गोष्ट मी मान्य केली आहे. मृत्यूशिवाय आयुषाचा विचारच करणं चुकीच आहे, मृत्यू हा कोणालाच चुकलेला नाही, त्यासाठी एवढी घाई करायची काहीच गरज नाही.” कमल हासन ‘कल्की २८९८ एडी’बरोबरच दिग्दर्शक शंकर यांच्या आगामी ‘इंडियन २’मध्येही झळकणार आहेत.