दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘विक्रम’ हा चित्रपट चांगलाच गाजला. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता कमल हासन दिग्दर्शक नाग अश्विनच्या ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होत आहे. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, कमल यांनी या चित्रपटासाठी होकार दिला असून या भूमिकेसाठी त्यांनी जबरदस्त मानधन आकारलं असल्याचं स्पष्ट झालं आहे.

या चित्रपटात सुपरस्टार प्रभासही दिसणार आहे. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार कमल हासन या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ऑगस्टमध्ये कमल हासन सुमारे २० दिवस या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वेळ काढणार आहेत. निर्माते लवकरच या चित्रपटातील कलाकारांची अधिकृत घोषणा करणार आहेत.

आणखी वाचा : “मला पाकिस्तानी असल्याचा अभिमान…” शाहरुख खानच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमागील सत्य जाणून घ्या

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमल हासन यांनी या चित्रपटासाठी १५० कोटी रुपये मानधन आकारल्याची चर्चा आहे. मध्यंतरी याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती. अजून कमल हासन यांच्या टीमकडून याबद्दल काहीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाचे बजेट खूप जास्त आहे. हा एक सायन्स फिक्शन चित्रपट असेल, ज्यामध्ये प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, दिशा पटनी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ५०० कोटींच्या बजेटमध्ये बनत आहे. याची निर्मिती वैजयंती मुव्हीज करत आहे तर याचे संगीतकार संतोष नारायण आहेत. आता कमल हासन यांच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षकांची आणखी उत्सुकता वाढली आहे.