आयसीसी T20 वर्ल्ड कपचा उत्साह सध्या देशभरात पाहायला मिळतोय. भारत- पाकिस्तानमध्ये होत असलेल्या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्साही आहेत. यातच आता कायम वादग्रस्त विधानांमुळे आणि खळबळजनक भविष्यवाणीमुळे चर्चेत असलेला अभिनेता कमाल आर खान म्हणजेच केआरकेने भारत-पाकिस्तान सामन्यावर एक ट्वीट केलं आहे. त्याचं हे ट्वीट सध्या चांगलच चर्चेत आहे.

केआरकेने भारत-पाकिस्तान सामन्यावर एक ट्वीट केलंय. यात तो म्हणाला, “भारत आणि पाकिस्तानमधील सामना हा काही सामना नाही…ही तर फक्त एक थट्टा आहे. पूर्ण जगाला माहितेय की भारतच सामना जिंकणार” अंस तो ट्वीटमध्ये म्हणालाय. तर केआरकेच्या या ट्वीटवर काही पाकिस्तानी नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी हिना खानने केली ‘अशी’ तयारी, शेअर केला व्हिडीओ


केआरकेने आजवर अनेक सेलिब्रिटींची भविष्यवाणी केलीय. यात अनेकदा नकारात्मक भविष्यवाणी केल्याने त्याला ट्रोल देखील व्हाव लागलंय. मात्र यंदा त्याने भारतीय संघाच्या विजयाची भविष्यवाणी केलीय. केआरकेने भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा दिला आहे. आजवर ICC क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान एकदाही भारतासमोर जिंकलेला नाही.

काम सोडून अक्षय कुमार काढतोय झोपा, कतरिनाने व्हिडीओ शेअर करत केला पर्दाफाश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॉलिवूड सेलिब्रिटींवर टीका केल्याने केआरके कायमच चर्चेत आला आहे. मात्र खास करून सलमान खानशी पंगा घेतल्याने तो अधिक चर्चेत आला. केआरकेने सलमान खानच्या ‘राधे’ सिनेमाचा रिव्हूयू केला होता. यात राधे सिनेमा फ्लॉप असल्याचं तो म्हणाला होता. त्यानंतर सलमानने केआरकेवर मानहानीचा दावा केला होता.