scorecardresearch

काम सोडून अक्षय कुमार काढतोय झोपा, कतरिनाने व्हिडीओ शेअर करत केला पर्दाफाश

कतरिनाने शेअर केलेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांची मोठी पंसती मिळतेय

काम सोडून अक्षय कुमार काढतोय झोपा, कतरिनाने व्हिडीओ शेअर करत केला पर्दाफाश
(Photo: Katrina Kaif/Instagram)

अभिनेत्री कतरिना कैफ सध्या ‘सूर्यवंशी’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कतरिनाने नुकताच सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. हा व्हि़डीओ शेअर करत तिने अभिनेता अक्षय कुमार आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केलाय. कतरिनाने शेअर केलेला हा धमाल व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

कतरिनाने शेअर केलेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांची मोठी पंसती मिळतेय. या व्हि़डीओत ती म्हणतेय, “आज सूर्यवंशीच्या प्रमोशनचा पहिला दिवस आहे आणि आजवर मी रोहित आणि अक्षयला इतकं उत्साही कधीच पाहिलेलं नाही. त्यांच्यात खूप एनर्जी आणि जोश दिसतो” असं म्हणत कतरिनाने कॅमेरा रोहित आणि अक्षयकडे वळवला. ज्यात अक्षय कुमार रोहितच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला दिसतोय. तर रोहितही निवांत बसलेला दिसतोय. कतरिनाला पाहताच अक्षय दचकून उठतोय आणि ती शूटिंग करू नकोस असं सांगत आहे. यावर कतरिना म्हणते, “तू सकाळी पाच वाजता उठवतोस आणि मग तू थकून जातोस”

आता छोटे व्यवसायिक आणि दुकानदारांच्या जाहिरातींमध्येही झळकणार शाहरुख खान


तर अक्षय कुमार कतरिनाला व्हिडीओ रेकॉर्ड करू नकोस असं सांगत आहे. “व्हिडीओ रेकॉर्ड करू नको हे बरोबर दिसत नाही आमची इज्जत राख” असं म्हणत तो उठून पळत सुटतो. यावेळी खुर्चीत पाय अडकून तो खाली पडतोय. हा धमाल व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

“तुम्ही आता जे आहात त्यासाठी कृतज्ञ रहा”, नागा चैतन्यासोबतच्या घटस्फोटानंतर समांथाची पोस्ट

हा व्हिडीओ शेअर करत कतरिनाने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “प्रमोशनच्या पहिल्या दिवशी मुलांचा उत्साह तर पहा”. कतरिनाच्या या व्हिडीओवर अक्षय कुमारने कमेंट केलीय. तो म्हणाला, “दीड वर्षापासून सूर्यवंशीची वाट पाहतोय..त्यामुळे काही क्षणांची शांतता तर हवीच ना. पण तुझ्यासारख्या खोड्या करणाऱ्यांना त्रास द्यायला आवडतो. असो काही चिंता नाही.” असं अक्षय म्हणाला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-10-2021 at 18:41 IST

संबंधित बातम्या