बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत सध्या तिच्या अनेक आगामी प्रोजेक्टवर काम करत आहे. यातच कंगनाने मंगळवार १३ जुलैला एक मोठी घोषणा केलीय. कंगनाच्या प्रोडक्शन हाउसमध्ये बनणाऱ्या ‘टीकू वेड्स शेरू’ या सिनेमामध्ये उत्कृष्ट अभिनेता नावाजुद्दीन सिद्दीकीची एण्ट्री झाली आहे. कंगना रणौतने सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने कंगना आणि नवाजुद्दीनची जोडी पहिल्यांना एकत्र झळकणार आहे.
‘टीकू वेड्स शेरू’ या सिनेमातून कंगना रणौत डिजिटल विश्वात पदार्पण करत आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवाजुद्दीन सिद्दीकीचा एक फोटो शेअर केलाय. यात तिने “टीममध्ये तुमचं स्वागत आहे.” असं कॅप्शन देत नवाजचं स्वागत केलंय. तसंच कंगनाने मणिकर्णिका फिल्मच्या अकाऊंटवरूनदेखील एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये लिहिलंय, “आमच्या पिढीतील उत्कृष्ट अभिनेता ‘टीकू वेड्स शेरू’ च्या टीममध्ये सामील झालाय. आम्हाला आमचा सिंह भेटल्याने सन्मानित वाटतंय.” यासोबत या पोस्टमध्ये सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरु होणार असल्याचं सांगण्यात आलंय.
View this post on Instagram
कंगनाच्या सिनेमात नवाजुद्दीनची एण्ट्री झाल्याने चाहते देखील उत्साही आहेत. ‘टीकू वेड्स शेरू’ हा एक डार्क कॉमेडी सिनेमा असणार आहे. सध्या कंगान तिचा आगामी सिनेमा ‘धाडक’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता आणि शारिब हाशमी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. यासोबतच कंगना ‘तेजस’ या सिनेमाच्या प्रोजेक्टवरही काम करतेय.
तर नवाजुद्दीन लवकरच अभिनेत्री नेहा शर्मासोबत ‘जोगीरा सारा रा रा’ या सिनेमातून झळकणार आहे.