कंगना रणौतला सिनेसृष्टीत दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. तिने तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक उत्तम भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूडमध्ये आपले नशिब आजमावण्यासाठी आलेल्या कंगना रणौतला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. तिच्या या खडतर प्रवासाला ‘क्वीन’ चित्रपटाच्या रुपाने यशाचा मार्ग गवसला. ७ मार्च २०१४ या दिवशी प्रदर्शित झालेला ‘क्वीन’ हा चित्रपट तिच्या करिअरमधील महत्त्वाचा चित्रपट ठरला. यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिले नाही. कंगनाच्या ‘क्वीन’ या चित्रपटाच्या रिलीजला ८ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने कंगनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केला आहे. या तिने चित्रपटाशी संबंधित आठवणी शेअर केल्या आहेत. यावेळी तिने या चित्रपटाच्या प्रवासाबद्दलची माहिती शेअर केली आहे.

कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे. यात तिने ‘क्वीन’ चित्रपटाच्या सेलिब्रेशनचा एक फोटो शेअर केला आहे. कंगनाने शेअर केलेल्या फोटोत महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, आर. अश्विन, मयांक अग्रवाल, अजिंक्य रहाणे यांसह इतर क्रिकेटपटू दिसत आहे. हे सर्वजण डोक्यावर टोपी घालून जंगी सेलिब्रेशन करत असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर तिने त्यावर या चित्रपटाच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे.

“आज याच दिवशी ७ मार्च २०१४ रोजी ‘क्वीन’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर माझे आयुष्य कायमचे बदलून गेले. त्यानंतर मी अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारल्या. ‘दत्तो’, ‘मणिकर्णिका’, ‘थलायवी’…पण मला काय माहित होते की मी यापुढे काहीही केलं तरी लोक कायम मला राणी (क्वीन) म्हणूनच लक्षात ठेवणार आहेत”, असे कंगना म्हणाली.

कंगनाच्या ‘क्वीन’ला बॉक्स ऑफिसवर चांगलेच यश मिळाले होते. या चित्रपटाच्या यशामुळे कंगना ही पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली. दुसऱ्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर ११ कोटींचा व्यवसाय केल्यानंतर कंगनाचा ‘क्वीन’ तीन भाषांमध्ये निर्मित करण्यात आला होता. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनीसुद्धा ‘क्वीन’मधील भूमिकेसाठी कंगनाचे विशेष कौतुक केले होते.

“लतादीदींचा आशीर्वाद म्हणून मी हे कायम जपणार…”; हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंगना ही सध्या ‘लॉक अप’ या शोमध्ये काम करत आहे. यात ती टीव्ही क्वीन एकता कपूरसोबत दिसणार आहे. या शोमध्ये १६ स्पर्धक हे ७२ दिवसांसाठी ‘लॉक अप’मध्ये बंद राहणार आहेत. हा शो २७ फेब्रुवारीपासून सुरु झाला आहे.