जर ते मला अटक करायला आले, तर माझा मूड असा असेल; कंगनाचा बोल्ड फोटो चर्चेत

कंगनाने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

kangana ranaut, kangana ranaut bold photo,
कंगनाने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कंगना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत कंगना चाहत्यांच्या संपर्तकात राहते. कंगना तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच ती चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने कृषीविषयक कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर कंगनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तुलना खलिस्तानी चळवळीशी केली. त्यानंतर कंगना विरोधात अनेक ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता आजही तिच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर कंगनाने सोशल मीडियावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून एक एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत कंगनाने वाइनच्या ग्लास हातात घेतल्याचे दिसत आहे. काळ्या रंगाचा स्लिट स्कर्ट कंगनाने परिधान केलं आहे. हा फोटो शेअर करत “आणखी एक दिवस, आणखी एक एफआयआर..जर ते मला अटक करायला आले… तर सध्या घरी माझा मूड असाच आहे,” असे कॅप्शन कंगनाने त्या फोटोला दिले आहे.

आणखी वाचा : निलेश साबळेने पाया पडून मागितली नारायण राणेंची माफी; जाणून घ्या कारण

कंगनाने इंस्टाग्राम पोस्टमध्ये काय म्हटलं?

कंगनाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीत म्हटलं, “खलिस्तानी दहशतवादी आज शस्त्रास्त्रांच्या बळावर सरकारला प्रभावित करत असतील, पण एका महिलेला विसरायला नको. देशाच्या एकमेवर महिला पंतप्रधानाने त्यांना आपल्या चप्पलेखाली चिरडलं होतं. अशावेळी त्यांच्यामुळे या देशाला किती सहन करावं लागलं ते महत्त्वाचं नाही. इंदिरा गांधींनी स्वतःच्या जीवाची किंमत देऊन यांना डासांप्रमाणे चिरडलं. त्यांनी देशाचे तुकडे होऊ दिले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक दशकं झाली तरी त्यांच्या नावाने हे थरथर कापतात. त्यांना असाच गुरू पाहिजे.”

आणखी वाचा : प्रियांका होणार आई? निकसोबत चाहत्यांनाही बसला धक्का

कंगनाच्या विरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार इन्स्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आली आहे. या समितीने दिलेल्या माहितीनुसार, कंगनाच्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार ही मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील सायबर सेलमध्ये करण्यात आली आहे. या शीख समुदायाच्या मते, कंगनाने जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन असल्याचे वर्णन केले आहे. तसेच तिने शीख समुदायविरोधात वक्तव्य करतेवेळी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा वापर केला आहे, असे शीख समुदायाचे म्हणणं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kangana ranaut reacts to another fir with old photoshoot says pic in case they come to arrest me dcp

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या