बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौत सध्या बुडापेस्टमध्ये ‘धाकड’ या तिच्या आगामी सिनेमाचं शूटिंग करत आहे. कंगनाने तिच्या इन्स्टास्टोरीला ‘धाकड’ सिनेमाचा एका बीटीएस व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत कंगना अॅक्शन सीनसाठी ट्रेनिंग घेताना दिसतेय. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये कंगनाने लिहिलंय. “लडाकू नंबर वन”. या व्हिडीओत कंगना दोन व्यक्तींसोबत फायटिंग करताना दिसतेय.
कंगना तिच्या प्रत्येक भूमिकेसाठी कायमच मेहनत घेताना दिसते. त्याचप्रमाणे ‘धाकड’ सिनेमासाठी देखीस कंगनाने मोठी मेहनत घेतली आहे. या सिनेमात कंगनाचा दमदार अंदाज पाहायला मिळणार आहे.

‘धाकड’ सिनेमा एक अॅक्शन थ्रिलर सिनेमा असून या सिनेमात कंगना अर्जुन रामपालसोबत झळकणार आहे. या सिनेमात कंगना गुप्तहेराची भूमिका साकारणार असून ‘एजंट अग्नी’ असं तिचं नाव असणार आहे. या सिनेमात भरपू अॅक्शन सीन्स पाहायला मिळाणार असून हॉलिवूडमधील नावाजलेले अॅक्शन दिग्दर्शक हे सीन दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन रजनिश घई करत असून सोहेल मकलाई याची निर्मिती करणार आहेत. पुढच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होईल.
View this post on Instagram
kangana ranaut
‘धाकड’सोबतच कंगना ‘थलायवी’ सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा तयार असून प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. तर दुसरीकडे कंगनाने ‘तेजस’ या सिनेमाच्या प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात केलीय.