दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांचा मुद्दा चर्चेत आणला आहे. या चित्रपटात १९९०च्या दशकातील काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे चित्रण करण्यात आले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांचे डोळे पाणावल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटाचे देशभरातून कौतुक होत आहे. तर या सगळ्यात बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कंगना भारत-पाकिस्तान फाळणी आणि मुस्लिम लोकसंख्येवर भाष्य केले. या व्यतिरिक्त कंगनाने लोकांना हा चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे.

कंगनाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत कंगना बोलते की, “काल रात्री मी आणि माझ्या कुटुंबाने ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिला. सगळ्यात आधी विवेक अग्रीहोत्री आणि त्यांच्या टीमला कंगना धन्य आहात असे बोलते. या चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून तुम्ही या देशाला जे दिलं आहे. संपूर्ण देशात आम्हाला अभिमान वाटेल असं काम तुम्ही केलं आहे. चित्रपटसृष्टी सदैव तुमची आभारी असेल. आपण अनेक दशकांपासून केलेली आमची सर्व पापं देखील धुऊन टाकली आहेत. मी सर्वांच्या वतीने तुमचे आभार मानते.”

आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video

आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम मायराच्या घरी आलिशान इलेक्ट्रिक कारचे आगमन, किंमत ऐकलीत का?

पुढे कंगना मुस्लिम लोकांच्या लोकसंख्येवर म्हणाली, “काश्मीरमधील या घटनेला एक दिवसाची घटना समजनं ही सर्वात मोठी चूक आहे. जेव्हा भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान हा देश तयार झाला. तेव्हा इथे जेवढे हिंदू होते तेवढेच मुस्लिम होते. आज भारत आणि पाकिस्तानमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या बघा आणि आता नावालाही हिंदू नाहीत. रोज त्यांना मारून फेकलं जातं, रोज त्यांच्या विनयभंग होतो. कुठे गेले कोटींच्या संख्येने असलेले ते लोक?”

आणखी वाचा : किरण रावमुळे पहिल्या पत्नीसोबत लग्न मोडलं का? आमिर खानने दिलं उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे कंगनाने, बांग्लादेशमध्ये गेल्या वर्षी झालेल्या घटनेवर वक्तव्यं केलं आहे. “ही सरकारची लढाई नाही, ती सभ्यतेची लढाई आहे. प्रत्येक भारतीयाची एक लढाई असते. आपल्याला कोणी काही सांगणार नाही. आपल्यात असलेली माणूसकी आपल्याला सगळ्या गोष्टींची जाणीव करून देईल. यानंतर कंगनाने लोकांना हात जोडून विनंती केली की, जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट बघावा आणि एकत्र नव्या भारताला बनवूया.”