ग्रॅमी पुरस्कार सोहळा हा संगीत क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यानंतर काही दिवसांपूर्वीच यंदाच्या ग्रॅमी पुरस्कारांची घोषणा झाली. संगीत क्षेत्रात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात स्वर्गीय गायिका लता मंगेशकर यांना मानवंदना देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक भारतीय चाहत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान नुकतंच या पुरस्कार सोहळ्यावर अभिनेत्री कंगना रणौतने संताप व्यक्त केला आहे. कंगना रणौतने एक पोस्ट शेअर करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यात तिने ग्रॅमी पुरस्कारावर टीका केली आहे.

कंगना ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध विचारांवर मत मांडताना दिसते. नुकतंच कंगनाने ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यावर टीका करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत पाश्चिमात्य देशातील पुरस्कारांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.

Video: हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल, ‘या’ कृतीने वेधले चाहत्यांचे लक्ष

“आपल्याला कोणत्याही स्थानिक पुरस्कारांबाबत ठामपणे आक्षेप घेता आला पाहिजे. या पुरस्कार सोहळ्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजावाजा केला जातो, पण हेच लोक अनेक दिग्गज कलाकारांना त्यांचा वर्णभेद किंवा विचारसरणीमुळे जाणूनबुजून दुर्लक्षित करतात”, असे कंगना म्हणाली.

ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यावर भारतीय नाराज, लता मंगेशकर यांना श्रद्धांजली न वाहिल्यानं चाहत्यांनी व्यक्त केली खंत

“ऑस्कर आणि ग्रॅमी या दोन्हीही पुरस्कार सोहळ्यात भारतरत्न लता मंगेशकर यांना मानवंदना देण्यात आली नाही. त्यामुळे ते कुठेतरी अयशस्वी ठरले. जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित समजले जाणारे हे पुरस्कार असल्याचा दावा करणाऱ्या या पक्षपाती स्थानिक कार्यक्रमांवर आपल्या प्रसारमाध्यमांनी पूर्णपणे बहिष्कार टाकला पाहिजे”, असेही कंगनाने म्हटले.

दरम्यान अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या वेळीही दिवंगत भारतीय अभिनेता दिलीप कुमार आणि लता मंगेशकर यांच्या नावाचा उल्लेख ‘इन मेमोरिअम’ विभागात झाला नव्हता. यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत होते.

प्रसिद्ध अभिनेत्रीने KKR च्या क्रिकेटपटूला विचारले ‘तू कोण?’; चाहते म्हणाले “तो तुझ्यापेक्षा जास्त प्रसिद्ध…”

त्यातच ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यातही भारतीय पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचं नाव ‘इन मेमोरिअम’ विभागातून वगळण्यात आलं. विशेष म्हणजे अकादमी पुरस्कारांच्या ‘इन मेमोरिअम’ विभागाच्या यादीतही लतादीदींचं नाव नव्हतं. यामुळे त्यांचे चाहते हैराण झाले आहेत. अनेक चाहत्यांनी यावर संताप व्यक्त करत या पुरस्कार सोहळ्यांना ट्रोल करण्यासही सुरुवात केली होती.