कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते सतीश वज्र यांची हत्या करण्यात आली आहे. सतीश वज्र यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला आहे. काही अज्ञात व्यक्तींनी सतीश यांची हत्या केल्याचे सांगितले जात आहे. सतीश वज्र यांच्या हत्येनंतर कन्नड चित्रपटसृष्टी हादरली आहे. सतीश यांच्या मेहुण्यानेच त्यांचा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश हे बंगळुरुतील आरआर नगरमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होते. रविवारी सतीश हे कामावरुन परतले असता दोन अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी धारदार शस्त्राच्या मदतीने त्यांची हत्या करण्यात आली. यानंतर मारेकरी तिथून पसार झाले.

त्यानंतर काही वेळाने त्यांच्या नोकराने सतीश यांच्या रुममधून रक्त येत असल्याचे पाहिले. यानंतर त्याने पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटिव्हीची तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी सतीशचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

त्याच्या हत्येच्या बातमीनंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याचे अनेक चाहते याप्रकरणी हळहळ व्यक्त करत आहेत. दरम्यान सतीश वज्र यांनी कुटुंबाच्या विरोधात लग्न केले होते. या लग्नामुळे तो किंवा त्याच्या पत्नीचे कुटुंबीय देखील आनंदी नव्हते. यावरुन दोन्ही कुटुंबात वादाचे वातावरण निर्माण झाले होते. याच कारणामुळे तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीनेही आत्महत्या केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सतीशच्या मेहुण्याने त्याची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या पोलीस हे सतीशचा मेहुणा आणि सासऱ्यांचा शोध घेत आहेत. सतीशने ‘लागोरी’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्याला सहाय्यक भूमिकांमध्ये खूप प्रसिद्धी मिळाली होती. तो आपल्या कुटुंबासह आरआर नगरमध्ये राहत होता.