Kantara Chapter 1 Box Office Collection Day 6 : अभिनेता ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केलं होतं. आता तीन वर्षांनंतर या फ्रँचायजीचा दुसरा भाग ‘कांतारा चॅप्टर १’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सहा दिवसांत या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे.
‘कांतारा चॅप्टर १’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाची जादू प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. १२५ कोटींमध्ये हा चित्रपट तयार झाला आहे. फक्त सहा दिवसांत या चित्रपटाने त्याच्या बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे. ‘सॅकनिल्क’च्या आकडेवारीनुसार, ‘कांतारा : चॅप्टर १’ने सहाव्या दिवशी ३३.५० कोटी कमावले, ज्यामुळे भारतात त्याचे सहा दिवसांत एकूण कलेक्शन २९०.२५ कोटी झाले. ‘कांतारा चॅप्टर १’ने पहिल्या दिवशी भारतात तब्बल ६० कोटींची कमाई केली होती.
‘कांतारा चॅप्टर १’ हा चित्रपट ३०० कोटी रुपयांपासून किती दूर?
‘कांतारा चॅप्टर १’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर सहा दिवसांतच या चित्रपटाने २९०.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि १२५% पेक्षा जास्त नफा मिळवला आहे. आता तो ३०० कोटी रुपयांपासून फक्त १० कोटी रुपयांनी दूर आहे. सध्या सर्वांच्या नजरा बॉक्स ऑफिसवर आहेत. या चित्रपटाचं समीक्षक व प्रेक्षक कौतुक करीत आहेत. तसेच सिनेमा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. ‘कांतारा चॅप्टर १’चे अॅडव्हान्स बुकिंगदेखील जबरदस्त झाले होते. त्यामुळे चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच कोट्यवधी रुपये कमावले.
‘कांतारा चॅप्टर १’ हा २०२२ च्या हिट कन्नड चित्रपट ‘कांतारा’चा प्रीक्वेल आहे. हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वांत बिग बजेट कन्नड चित्रपट आहे. त्याचबरोबर या वर्षीचा मोस्ट अवेटेड भारतीय चित्रपट आहे. ऋषभ शेट्टीने स्वतः दिग्दर्शित केलेल्या ‘कांतारा चॅप्टर १’ या चित्रपटात रुक्मिणी वसंत, गुलशन देवैया व जयराम हे कलाकारही आहेत.