कपिल शर्मा या शोमध्ये अनेक मोठमोठ्य चित्रपटांचं प्रमोशन करण्यात येतं. त्यामुळे आपल्या विनोदाने अनेकांना हसविणारा कपिल या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही करतो. सहाजिकचं तो या भूमिकेसाठी चांगलं मानधन घेत असणार अशी शक्यता आहे. साधारणपणे अशा रिअॅलिटी शोसाठी कलाकार पाच ते सात लाखांपर्यंत मानधन घेतात. परंतु कपिल एका एपिसोडसाठी जे मानधन घेतो ते बॉलिवूड सेलिब्रिटींनाही मागे टाकणारं आहे.
कपिल त्याच्या एका भागासाठी ८० ते ९० लाख रुपये मानधन घेत असल्याचं सांगण्यात येत आहे. तसं या शोव्यतिरिक्त कपिल अनेक ब्रॅण्डचा सदिच्छादूतदेखील आहे.विशेष म्हणजे एखाद्या कंपनीच्या जाहिरातीसाठी तो एक कोटी रुपये मानधन आकारतो. कपिलने २०१४-१५ मध्ये आपल्या मानधनात वाढ केल्याचं सांगण्यात येतं.