अभिनेता कपिल शर्मा पूर्वीपेक्षा खूपच तंदुरुस्त झाला आहे, पण आता त्याचा नवीन व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. गेल्या काही वर्षांत कपिलने वजन कमी केले होते, पण आता तो पूर्वीपेक्षा खूपच तंदुरुस्त झाला आहे. कपिलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो डोंगराळ रस्त्यांवर धावताना दिसत आहे. कपिलचे ट्रान्सफॉर्मेशन आश्चर्यकारक आहे.
कपिलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो केशरी रंगाचे लोअर्स, काळ्या रंगाची हुडी आणि टोपी घातलेला दिसत आहे. कपिल कानात हेडफोन घालून डोंगराळ रस्त्यांवर धावत आहे. त्याच्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये कपिलने लिहिले आहे की, “कठोर परिश्रम करा, निसर्ग तुमच्याबरोबर आहे.” कपिलच्या चाहत्यांनी त्याच्या व्हिडीओवर खूप कमेंट केल्या आहेत. कपिलचे चाहते त्याला सांगत आहेत की, तो ज्या ठिकाणी धावत आहे, तिथली हवा स्वच्छ आहे आणि ती त्याच्या आरोग्यासाठी चांगली आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ केला शेअर
अनेक चाहत्यांनी मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. कपिलने ‘झ्विगाटो’ चित्रपटात डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारली होती, म्हणून एकाने लिहिले, “कपिल पाजी स्विगीची डिलिव्हरी द्यायला चालले.” कपिल शर्मा वजन कमी करण्यासाठी ओझेम्पिक वापरत आहे, असे अनेक लोकांनी म्हटलं आहे. परंतु, आता त्याच्या नवीन व्हिडीओमध्ये तो वजन कमी करण्यासाठी कठोर परिश्रम करत असल्याचे दिसून आले आहे. कपिल शर्मासह असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. यामध्ये ज्युनियर एनटीआर, राम कपूर आणि करण जोहर यांची नावेदेखील आहेत.
काही दिवसांपूर्वी मुंबई एअरपोर्टवर कपिलला पाहिलं गेलं होतं. पापाराझींनी कपिलचे काही फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले होते. सोशल मीडियावर ते क्षणार्धात व्हायरल झाले होते. त्या व्हिडीओमधील कपिलचा बदललेला लूक पाहून चाहते हैराण झाले होते. कपिलचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेक जण थक्क झाले आहेत.
कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कपिल आता लवकरच ‘किस किस को प्यार करू २’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच त्याने याची घोषणा केली आहे. ‘कॉमेडी नाइट विथ कपिल’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमांमुळे अभिनेता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. सध्या तो नेटफ्लिक्सवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये दिसत आहे.