कॉमेडियन कपिल शर्मा ‘द कपिल शर्मा’ या शोमधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत असतो. तसचं येणाऱ्या सेलिब्रिटींसोबत धमाल गप्पा मारत असतो. अनेकदा कपिल त्याच्या शोमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसोबतही धमाल करताना दिसतो. यंदा मात्र कपिलच्या शोमध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेल्या कपिल शर्माच्या आईनेच एका गोष्टीचा खुलासा केला आहे.

शनिवारच्या खास भागात ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री चित्रांगदा सिंहने हजेली लावली होती. यावेळी कपिल प्रेक्षकांमध्ये बसलेल्या आईशी देखील संवाद साधला. यावेळी त्याने अभिषेक आणि चित्रांगदासोबत आईची ओळख करून दिली. तसचं कपिलने लग्न करावं म्हणून त्याची आई आधी सतत मागे लागली होती. मात्र आता लग्न झाल्यानंतर ती सुनेसोबत म्हणजेच गिन्नीसोबत अजिबात घरी बसत नाही असं कपिल म्हणाला. यावर कपिलच्या आईने मजेशीर उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “सून मला घरी बसूच देत नाही. मी काय करू?”

आयुष शर्माने शेअर केला लग्नातील ‘तो’ किस्सा, आमिर खान समोर येणं झालं होतं मुश्किल

पुढे त्या म्हणाल्या, “ती म्हणते लवकर शोला जा. ती आधीच पटापट माझे ड्रेस काढून ठेवते. हो ती असचं करते.” असं कपिल शर्माच्या आईने शोमध्ये सांगताच अभिषेक आणि चित्रांगदासह प्रेक्षकांनाही हसू आवरणं कठीण झालं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


काही दिवसांपूर्वीच कपिलने ‘कौन बनेगा करोडपती १३’ शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी देखील कपिलची आई त्याच्यासोबत शूटला सुरतमध्ये गेली असल्याचा खुलासा कपिलने केला. या शोमध्ये बिग बींनी कपिल शर्माच्या आईला एक प्रश्नही विचारला होता. ‘कपिलच्या जन्माआधी तुम्ही काय खाल्ल होतं?’ असा प्रश्न त्यांनी विचारला होता. यावर कपिल शर्माच्या आईने ‘डाळ फुलका’ असं निरागसपणे उत्तर दिलं होतं.