करण जोहरच्या तोंडी नेहमीच आलिया भट्टचं नाव असतं अशी टीका त्याच्यावर करण्यात येते. ‘कॉफी विथ करण ७’ शोच्या पहिल्या भागापासून करणच्या तोंडी आलियाचं नाव ऐकायला मिळालं. संपूर्ण देशामध्ये आलिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे असंही करणने म्हटलं होतं. यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण या सगळ्या चर्चांबाबत आलियाची प्रतिक्रिया काय होती? याबाबत करणने सांगितलं आहे.

आणखी वाचा – Video : आजीला अखेरचा निरोप देताना ढसाढसा रडली महेश बाबूची लेक, आईला मिठी मारली अन्…

‘कॉफी विथ करण ७’चा शेवटचा भाग आता प्रदर्शित झाला आहे. या शोच्या शेवटच्या भागामध्ये विनोदी कलाकार तन्मय भट्ट, दानिश सैत, युट्युबर कुशा कपिला व निहारिका एनएम हजेरी लावली होती. यादरम्यान या चौघांनीही करणला त्याच्या खासगी आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले. त्याचबरोबरीने आलिया भट्ट, जान्हवी कपूर, सारा अली खानबाबतही त्याला काही प्रश्न विचारण्यात आले.

करण यावेळी म्हणाला, “मी आलिया भट्टबाबत बरंच बोलतो असं लोक मला सतत बोलत असतात. पण खरंच यामध्ये तथ्य आहे का?” यावर कुशा म्हणाली, “याबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगते.” तर तन्मय म्हणतो, “ऐक करण ती आता गरोदर आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये लाँच करण्यासाठी तुझ्याकडे आता एक नवी व्यक्ती येत आहे.”

आणखी वाचा – पहिल्यांदाच आपल्या रिलेशनशिपबाबत बोलला करण जोहर, म्हणाला, “ब्रेकअप झालं अन्…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सगळ्या चर्चांनंतर करणने अगदी सडेतोड उत्तर दिलं. तो म्हणाला, “आलिया व माझ्याबाबत आता अशाप्रकारच्या चर्चा होत आहेत हे पाहून मी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवून बोलतो. इतकंच नव्हे तर आलियाशीदेखील माझं याबाबत बोलणं झालं. तेव्हा आलिया मला म्हणाली माझं तू नाव घेणं बंद कर. यावर मी ठिक आहे असं उत्तर दिलं. कारण ती जर मला शांत राहण्यासाठी सांगत असेल तर मी आलियाबाबत न बोलणंच योग्य ठरेल.” Italia हे नाव लिहिलेलं जॅकेट करणने घातलं तेव्हा आलियाच्या नावाचं जॅकेट परिधान केलं असल्याचं मला बोललं गेलं असंही करण यावेळी म्हणाला.