Karan Johar reacts to poor health rumours after viral photo : करण जोहरने खूप वजन कमी केले आहे, ज्याबद्दल सर्व जण बोलत आहेत. पण, अलीकडेच त्याचा एक फोटो समोर आला होता, ज्यानंतर चाहत्यांना त्याच्या तब्येतीबद्दल काळजी वाटू लागली.
त्या फोटोमध्ये तो खूप बारीक दिसत होता, जे पाहून लोकांना वाटू लागले की तो आजारी आहे का. आता या सगळ्याबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया समोर आली आहे, ज्यामध्ये तो व्हायरल झालेल्या फोटोबद्दल बोलला आहे.
आता, ‘धडक २’च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये करण जोहर त्याच्या वजन कमी होण्याबद्दल आणि आरोग्याबद्दलच्या अफवांबद्दल बोलला. तो म्हणाला, “काल मी इंटरनेटवर वाचत होतो, लोकांनी तर मला मारूनच टाकले होते. लोक म्हणाले की काय झाले आहे या करण जोहरला, किती आजार आहेत? मी सर्वांना सांगू इच्छितो की, माझी तब्येत पूर्णपणे ठीक आहे, मी खूप आनंदी आहे. खरे सांगायचे तर मला यापूर्वी कधीही माझ्या पायांवर इतके हलके वाटले नव्हते.”
करण पुढे म्हणाला, “वजन कमी करण्यामागे एकच कारण आहे – माझ्या आयुष्यात निरोगी बदल आणण्यासाठी मी अनेक निरोगी सवयी अंगीकारल्या आहेत. मी जिवंत आहे आणि जगणार आहे. अशा गोष्टी बोलणाऱ्या नेटिझन्सना मी संबोधित करू इच्छितो. मला बरीच वर्षे जगायचे आहे, विशेषतः माझ्या मुलांसाठी. माझ्या मनात अजूनही अनेक स्टोरीज शिल्लक आहेत, त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचाव्यात अशी माझी इच्छा आहे.”
खरं तर, अलीकडेच रेडिटवर करण जोहरचा एक फोटो पोस्ट करण्यात आला होता, ज्यामुळे अनेकांना त्याच्या तब्येतीबद्दल काळजी वाटली. एका वापरकर्त्याने विनोदाने लिहिले, “तो सिम्पसन्समधील मिस्टर बर्न्ससारखा दिसतो.” दुसऱ्या एका टिप्पणीत असे लिहिले गेले की, “त्याने आधीच स्पष्ट केले आहे की तो स्ट्रिक्ट डाएट, खेळ/व्यायाम यांचे संयोजन पाळत आहे… तो खरोखर वाईट दिसत आहे, परंतु मला खरंच वाटत नाही की तो कोणत्याही मोठ्या आजाराने ग्रस्त आहे.” एका वापरकर्त्याने ओझेम्पिकच्या दुष्परिणामांबद्दल अंदाज लावला आणि टिप्पणी केली, “त्याचे शरीर अपेक्षेपेक्षा वेगाने खराब होत आहे आणि तो वृद्ध होत आहे.”
करण जोहरचा आगामी चित्रपट ‘धडक २’ या वर्षी १ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर दिग्दर्शनाची जबाबदारी शाजिया इक्बाल यांच्या खांद्यावर आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहेत.