‘इमरान खान आणि करीनाचे लग्न…’, करण जोहरने व्यक्त केली होती इच्छा

एका मुलाखतीत करणने त्याची ही इच्छा व्यक्त केली होती.

karan johar wished that kareena kapoor and imran khan were married
'गोरी तेरे प्यार में' या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी एका मुलाखतीत करणने ही इच्छा व्यक्त केली होती.

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खानने आज वर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक अभिनेत्यांसोबत करीनाची जोडी ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यापैकी एक अभिनेता म्हणजे इमरान खान. इमरान खान आणि करीनाने २ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. मात्र, त्यांची केमिस्ट्री ही फक्त प्रेक्षकांना नाही तर बेबोचा खास मित्र आणि दिग्दर्शक करण जोहरला देखील आवडली होती. त्यांच्यात असलेली केमिस्ट्री पाहता त्यादोघांनी लग्न केलं पाहिजे अशी करणची इच्छा होती.

‘गोरी तेरे प्यार में’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात करणने त्याची ही इच्छा व्यक्त केली होती. करण म्हणाला होता की करीना आणि इम्रानला खऱ्या आयुष्यात विवाहित जोडप म्हणून पाहण्याची माझी इच्छा आहे. “मला असे वाटते की ते दोघे एकत्र सुंदर दिसतात आणि ते एकत्र असले पाहिजे. त्यांचं लग्न झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे”, असे करण म्हणाल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

आणखी वाचा :  आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटावर राखी सावंत म्हणाली…

आणखी वाचा : शाहरुख खानने चक्क आलिया भट्टकडे मागितलं काम; रिट्विट करत म्हणाला, वचन देतो…

दरम्यान, हे ऐकताच करीना म्हणाली, “मग सैफचं काय होणार?” त्यावर इमरान खान म्हणाला, “तिला पाहिल्यावर मला अवंतिकाची आठवण येते. मला करीनासोबत काम करायचा मज्जा येते. मला तिच्यासोबत राहायला आवडते.” करीना आणि इमरानने ‘एक मैं और एक तू’ आणि ‘गोरी तेरे प्यार में’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Karan johar wished that kareena kapoor and imran khan were married dcp