बिग बॉस १५ ची विजेती तेजस्वी प्रकाश सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. करण कुंद्रा आणि प्रतीक सहजपाल यांना मागे टाकत तिने बिग बॉस १५चं विजेतेपद जिंकलं. बिग बॉसच्या घरात करणसोबतचं तिचं नातं नेहमीच चर्चेत राहिलं होतं. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही सोशल मीडियावर या दोघांची चर्चा कायम आहे. बिग बॉसचं विजेतेपद जिंकल्यानंतर तेजस्वी आणि करण डिनर डेटला गेले होते. त्यावेळचा त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्यात दोघांचाही रोमँटीक अंदाज पाहायला मिळत आहे. हा या दोघांच्या डिनर डेटनंतरचा व्हिडीओ आहे. ज्यात दोघंही एकमेकांसोबत खूप खूश दिसत आहेत. तेजस्वी आणि करणनं जेव्हा कॅमेराला पोझ दिली त्यावेळी त्यांचा रोमँटिक अंदाज पाहून फोटोग्राफर्सनी त्यांना ‘भैय्या-भाभी’ म्हणून हाक मारली. त्यावर दोघंही हसू लागले.

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्या डिनर डेटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. डिनर डेटनंतर जेव्हा फोटोग्राफर्सनी त्यांना पाहिलं. तेव्हा त्यांनी करणला विचारलं, ‘वहिनीचे फोटो काढायचे आहेत.’ त्यावर तेजस्वी जोरजोरात हसू लागली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिग बॉसच्या घरात जेव्हा फॅमिली वीक झाला होता त्यावेळी सर्व सदस्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासोबत व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्यावेळी करणनं तेजस्वीची त्याच्या आई-वडिलांशी ओळख करून दिली होती. त्यावेळी करणच्या वडिलांनी तेजस्वी आता घरातील खास व्यक्ती झाल्याचं म्हटलं होतं. एवढंच नाही तर तेजस्वीच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या या नात्याला परवानगी दिली होती.