करीना कपूर आणि सैफ अली खानच्या दुसऱ्या मुलाला पाहण्यासाठी चाहते गेल्या काही दिवसांपासून उत्सुक आहेत. नुकतचं सैफिनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर असल्याचं कळताच सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. त्यानंतर आता अखेर सैफ आणि करीनाच्या चिमुकल्या जहांगीरला मीडियाने स्पॉट केलं आहे. धाकटा नवाब मीडियाच्या कॅमेरात कैद झाला असून जेहचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होवू लागले आहेत.

जेहच्या जन्मापासूनच करीना आणि सैफने त्याला मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सैफिनाच्या धाकट्या मुलाची झलक कधी पाहायला मिळणार यासाठी चाहते उत्सुक होते. यातच आता सैफ आणि करीनाचा चिमुकला जेह मीडियाच्या कॅमेरात कैद झाला आहे. चिमुकल्या जेहचे क्यूट फोटो सोशलल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये सैफ अली खानने जेहला उचलून घेतल्याचं दिसतंय. यात जेह तैमूर इतकाच क्यूट असल्याचं दिसून येतंय. सैफ आणि करीनाला त्यांच्या दुसऱ्या मुलासोबत पहिल्यांदाच मुंबईत स्पॉट करण्यात आलंय.

हे देखील वाचा: मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्याने ट्रोल झालेल्या करीना कपूरने अखेर मौन सोडलं, म्हणाली “जरा विचार करा…”

 

View this post on Instagram

 

A post shared by (@filmygyan)

हे देखील वाचा: “तुझ्या मुलाचं नाव औरंगजेब ठेव”; नेटकऱ्याला स्वरा भास्कर म्हणाली “मला सुलेमान आवडतं”
सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर्सनी करीना कपूर आणि सैफसोबत जेहचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोंना चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सोशल मीडियावर करीनाच्या दुसऱ्या मुलाच्या नावावरून नुकताच वाद रंगला होता. करीनानने तिच्या ‘प्रेग्नेंसी बायबल’ या पुस्तकात धाकट्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याचा खुलासा केलाय. यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया पहायला मिळाल्या.