अभिनेत्री करीना कपूर जेव्हा दुसऱ्यांदा आई बनली तेव्हापासून तिचा छोटा मुलगा जेह लागोपाठ चर्चेत येतोय. करीना तिचं पुस्तक लॉंच केल्यानंतर जेहचा फोटो आणि त्याचं नाव जगासमोर जाहीर केलं. त्यानंतर सोहा अली खानने सुद्धा करीनाचा छोटा मुलगा जेहचा फोटो शेअर केलाय. करीनाचा धाकटा मुलगा जेहने त्याचा पहिला रक्षाबंधनाचा सण साजरा केला. त्यावेळचा हा फोटो सोहाने शेअर केलाय. त्यानंतर जेहचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

सोहा अली खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये सोहा अली खानची मुलगी इनाया आणि करीनाचा मुलगा जेह हे दोघे दिसून येत आहेत. इनाया आणि जेह यांनी पहिल्यांदा रक्षाबंधन साजरा केलाय. सोहाची मुलगी इनायाने आपल्या चिमुकल्या हाताने भाऊ जेहच्या हातावर राखी बांधली. ६ महिन्याच्या जहांगीरचं हे पहिलं रक्षाबंधन होतं. त्यामुळे बहीण इनाया अतिशय प्रेमाने त्याच्या हातावर राखी बांधताना दिसून आली. या दोघा चिमुकल्या भाऊ-बहीणीचं प्रेम या फोटोंमध्ये स्पष्टपणे झळकताना दिसून आलं. हे दोघे चिमुकले भाऊ-बहीण एका काऊचवर बसलेले दिसून येत आहेत. पहिल्या रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण इनायाने चिमुकला भाऊ जेहला किस केलं. या दोघांच्या भाऊ-बहीणींमधलं प्रेमळ क्षण पाहून फॅन्सनी देखील प्रेमाचा वर्षाव सुरू केला.

सोहा अली खानने हा फोटो शेअर करताना एक कॅप्शन देखील लिहिलीय. ‘पहिली राखी’ असं लिहित तिने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यासोबतच तिने या फोटोमध्ये करीना कपूरला देखील टॅग केलंय. याआधी इनायाने करीनाचा मोठा मुलगा तैमूरला सुद्धा राखी बांधली होती. याचा देखील फोटो तिने शेअर केला होता. तसंच करीनाचा मोठा मुलगा इब्राहिम आणि मुलगी सारा अली खान यांना देखील मिस करत असल्याचं सोहाने लिहिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Soha (@sakpataudi)

सैफ अली खानला सुद्धा सोहाने दिल्या शुभेच्छा

रक्षाबंधनाच्या दिवशी सोहाने तिचा भाऊ सैफ अली खानला शुभेच्छा दिल्या. मुलगी इनाया आणि तैमुरचा एक फोटो शेअर करत तिने भाऊ सैफ अली खानला क्यूट शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये मुलगी इनाया ही सैफी आणि करीनाचा मोठा मुलगा तैमूरला राख बांधताना दिसून येतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Soha (@sakpataudi)

आणखी वाचा: ‘घमंडी’ ‘मूर्ख बाई’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सना कियारा आडवाणीने दिलं सडेतोड उत्तर

सुट्ट्यांचा आनंद घेऊन परतले सैफ-करीना

काही दिवसांपूर्वीच अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी अभिनेत्री करीन कपूर हे मुलांसह सुट्ट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीवला गेले होते. सैफ अली खानने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ट्रिपचं प्लॅनिंग केलं होतं. तिथे गेल्यानंतरचे अनेक फोटोज देखील करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. गेल्या रविवारीत रक्षाबंधनाच्या दिवशी सैफ-करीना मालदीवरून घरी परतले आहेत.