नवाब आणि बॉलिवूडचा अभिनेता सैफ अलीखानचा आज वाढदिवस. आपल्या अभिनयनाने त्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्याचे करोडो चाहते त्याला शुभेच्छा देत आहेतच, मात्र त्याच्या पत्नीने म्हणजे करीन कपूर खान हिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याला शुभेच्छा तर दिल्याचं आहेत, त्याच कौतुक देखील केलं आहे. करीना कपूर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून सैफ अली खानचे फोटो टाकत असतेच.

करिनाने सैफचे दोन फोटो टाकत त्यावर कॅप्शन दिला आहे की, ‘जगातील सर्वोत्तम व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या वेड्या आयुष्यात येऊन तू आणखीन भर घातली आहेस, देवा मला हे दुसऱ्या कोणत्याही प्रकारे नको. हे फोटोस याच गोष्टींचा पुरावा आहेत माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि हे म्हणावंच लागेल कि तू माझ्यापेक्षा जास्त चांगले पाउट करतोस’, तुम्हाला काय वाटते? अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आमिर खानची काय चूक…” ‘लाल सिंग चड्ढा’ला प्रेक्षकांच्या थंड प्रतिसादावर मोना सिंगची नाराजी

करीना आणि सैफअली खान यांचे रोमँटिक फोटो व्हायरयल होत असतात. दोघांनी पहिल्यांदा ‘टशन’ या चित्रपटात काम केले होते. दोघांच्या प्रेमप्रकरणाला देखील याच चित्रपटापासून सुरवात झाली. ‘कुर्बान’ चित्रपटातील दोघांच्या अभिनयाची आणि रोमँटिक सीन्सची चर्चा झाली होती. १६ ऑक्टोबर २०१२ साली दोघांनी लग्न देखील केले. आज त्यांना दोन अपत्य आहेत.

सध्या तिच्या ‘लाल सिंग चड्ढा’ला’ प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांना तिने आवहान केले आहे की कृपया हा चित्रपट बॉयकॉट करून नका. प्रत्यक्षात हे एका चांगल्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यासारखंच आहे. जवळपास अडीच वर्ष २५० लोकांनी या चित्रपटासाठी काम केलं आहे.” असं करीनाने म्हटलं आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रत्येक प्रेक्षकाने पाहावा अशी करीनाची इच्छा आहे. शिवाय चित्रपटाबाबत होणाऱ्या ट्रोलिंगकडे सध्या करीना दुर्लक्ष करत आहे.