बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर काही ना कारणाने चर्चेत येत असते. करीनाने करियरच्या बरोबरीने आपल्या कुटुंबालादेखील तितकेच महत्व दिले आहे. नुकतीच ती कुटुंबियांबरोबर नववर्षाच्या स्वागतासाठी स्वित्झर्लंड येथे गेली आहे. तिने आपलया इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली. करीना बर्फाच्छादित पर्वत आणि नयनरम्य सौंदर्याचा आनंद घेतानाचे फोटो शेअर केले आहेत. तसेच तिने मुलाचा तैमूरचा स्केटिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमुर अली खान बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. करीनाने तिचा मोठा मुलगा तैमूर अली खानचा बर्फात स्केटिंग करतानाच व्हिडीओ शेअर केला आहे. याआधी करीनाने २०२२ वर्षाच्या शेवटच्या सूर्यास्ताचा फोटो शेअर केला आहे. ज्यात ती असं म्हणते २”०२२ च्या शेवटच्या सूर्यास्ताचा पाठलाग करत असताना मी पोझ देत आहे. चला २०२३ मध्ये” असा कॅप्शन तिने दिला होता. इतकंच नव्हे तर तिने चौघांचा फोटोदेखील शेअर केला होता. करीना, सैफ कामातून वेळ मिळाला की परदेशात सुटी एन्जॉय करत असतात.
Photos : टीव्ही कार्यक्रमातूनदेखील ‘हे’ स्टार्स कमावतात करोडो रुपये; एका भागासाठी घेतात ‘इतके’ मानधन
‘टशन’ चित्रपटापासून सैफ करीनाच्या प्रेमप्रकरणाला सुरवात झाली. प्रेमाचे रूपांतर खरे लग्नात झाले. १६ ऑक्टोबर २०१२ साली दोघांनी लग्नगाठ बांधली. दोन मुलांचे ते आईवडील आहेत. करीना आणि सैफने २०१६ मध्ये त्यांनी आपल्या पहिल्या मुलाला तैमूरला जन्म दिला तर मागच्या वर्षी फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाला म्हणजे जहांगीरला जन्म दिला.
दरम्यान करीना नुकतीच ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटात दिसली होती, या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. लवकरच ती आता दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे, तर सैफ अली खान ‘विक्रम वेधा’ चित्रपटात दिसला होता. आता तो ‘आदिपुरुष’ चित्रपटात दिसणार आहे.