बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही वर्षांपूर्वी करीनाने एका मुलाखतीत तिला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत डेटवर जायला आवडेल असे सांगितले आहे.

आणखी वाचा : “बाप कुणाला कळतो गं…”, मंजिरी ओकने Father’s Day निमित्ताने पती प्रसादसाठी शेअर केली ‘ही’ खास पोस्ट

करीनाने सिमी गरेवालच्या शोमध्ये हजेरी लावली होती. सिमी ग्रेवालच्या शोमध्ये सेलिब्रिटींनी अनेक खुलासे केले आहेत. यावेळी सिमी गरेवालने शोमध्ये येणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटीला जगात कोणत्या व्यक्तीसोबत डेटवर जायला आवडेल असा प्रश्न विचारला होता. यावेळी करीनाने तिला राहुल गांधीसोबत डेटवर जायला आवडेल. हा थ्रो बॅक व्हिडीओ Rendezvous with Simi Garewal या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

आणखी वाचा : ब्रह्मास्त्र: रणबीर कपूरने मंदिरात बूट का घातले? दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिले स्पष्टीकरण

आणखी वाचा : Don 3 साठी बिग बी आणि किंग खान येणार एकत्र? अमिताभ यांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या व्हिडीओत संजय लीला भंसाली यांनी माधुरी दीक्षित यांचे नाव घेतले आहेत. जॅकी श्रॉफ यांनी सुष्मिता सेन तर राकेश रोशन आणि गोविंदाने अभिनेत्री रेखा यांचे नाव घेतले. तर अभिनेत्रींनी त्यांना कोणासोबत डेटवर जायला आवडेल ते सांगितले. प्रियांकाने यावेळी प्रिन्स विलियम्ससोबत डेटवर जायला आवडेल. करीनासोबतच अमीषा पटेलने डेटवर जाण्यासाठी कॉंग्रेस नेता राहुल गांधीचं नाव घेतल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.