करिश्मा कपूर ही ९० च्या दशकातील टॉप हिरोइनपैकी एक मानली जाते. करिश्माने तिच्या करिअरमध्ये इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे. परंतु, गोविंदाबरोबर तिची चांगली जोडी जमली. या जोडीला प्रेक्षकांचीही तितकीच पसंती मिळाली. त्याकाळी या जोडीनं एक दोन नाही तर तब्बल ११ चित्रपटांत एकत्र काम केलं. आता करिश्मा कपूरने गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभव एका मुलाखतीत सांगितला आहे.

लेडीज स्टडी ग्रुपच्या एका कार्यक्रमात करिश्मा कपूरने त्या काळाची आठवण काढली आणि म्हणाली, “मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की तिन्ही खानबरोबर वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आम्ही सर्व तरुण होतो. आमिर खान, शाहरुख खान आणि अगदी गोविंदा यांच्यासह सर्व कलाकार एकमेकांपासून खूप वेगळे आहेत. मी त्या प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला.”

करिश्माने पुढे सांगितले की, तिच्या सहकलाकारांबरोबर काम केल्याने तिच्या कौशल्यांना कसा आकार मिळाला, ‘आमिरच्या बाबतीत, तो जे करतो त्याबद्दल तो खूप सावध असतो. तो खूप रिहर्सल करतो. सलमान त्याच्या अगदी उलट आहे, तो फक्त सेटवर येतो, काहीतरी करतो आणि ते खूप छान होते. शाहरुख नेहमीच मदतीला धावून यायचा. तो त्याच्या सहकलाकारांची खूप काळजी घेतो. या काही गोष्टी मी त्यांच्याकडून शिकले. पण, गोविंदाबरोबर काम करताना मी प्रत्येक वेळी सावध असायचे, कारण गोविंदा एक उत्तम अभिनेता आहे, शिवाय उत्तम डान्सरसुद्धा आहे, त्यामुळे त्याच्याबरोबर काम करताना खूप कम्फर्टेबल वाटायचं.”

अभिनेत्री एका प्रसंगाविषयी सांगत म्हणाली, “मी गोविंदाची मोठी चाहती होते. ‘खुदगर्ज’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माझी त्यांच्याबरोबर भेट झाली. त्यावेळी नीलम कोठारी डान्स करत होती, असा तो सीन होता. तेव्हा तुम्ही मला तिकडे घेऊन जाणार का असा हट्ट मी गोविंदाकडे केला होता. तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं आणि मी पूर्णपणे हरवून गेले होते,” असं अभिनेत्री म्हणाली.

करिश्मा कपूरने ‘राजा हिंदुस्तानी’,’हम साथ साथ हैं’, ‘हीरो नंबर 1′,’राजा बाबू’,’बीवी नंबर 1′ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून अभिनयाचा ठसा उमटवला. करिश्माने तिच्या करिअरमध्ये इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे.