scorecardresearch

‘किच्चा सुदीपचं वक्तव्य चुकीचं नाही…” कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचा अजय देवगणवर निशाणा

कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांनी किच्चा सुदीपला समर्थन देत अजय देवगणवर निशाणा साधला आहे.

karnataka formar cm, h d kumaraswamy, kiccha sudeep, ajay devgn, hindi language controversy, hindi national language row, ajay devgn tweet, kiccha sudeep tweet, ram gopal verma, किच्चा सुदीप, अजय देवगण, हिंदी राष्ट्रभाषा वाद, अजय दे देवगण ट्वीट, एच डी कुमारस्वामी, राम गोपाल वर्मा, कर्नाटक माजी मुख्यमंत्री
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच टी कुमारस्वामी यांनी अजय देवगणचं वागणं हे हास्यस्पद असल्याचंही म्हटलं आहे.

सध्या सोशल मीडियार दाक्षिणात्य स्टार किच्चा सुदीप आणि बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यांच्या झालेल्या हिंदी राष्ट्रभाषा वादाची जोरदार चर्चा सुरू आहे. बॉलिवूड सेलिब्रेटी यावर प्रतिक्रिया देत असतानाच आता यातवर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच टी कुमारस्वामी यांनीही आपलं मत मांडलं आहे. तसेच त्यांनी या वादात किच्चा सुदीपला पाठिंबा देत अजय देवगणचं वागणं हे हास्यस्पद असल्याचंही म्हटलं आहे. सध्या सोशल मीडियावर एच डी कुमारस्वामी यांचं ट्वीट व्हायरल होताना दिसत आहे.

एच डी कुमारस्वामी यांनी अजय देवगण आणि किच्चा सुदीप यांच्या ट्विटर वॉरनंतर एक ट्वीट करत या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिलं, ‘अजय देवगणनं ही गोष्ट मान्य करायला हवी की आता कन्नड चित्रपट हिंदी चित्रपटांवर वरचढ ठरत आहेत. पण दाक्षिणात्य लोकांच्या प्रोत्साहनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीचा विकास झाला आहे. अजयने हे विसरू नये की त्याचा पहिला चित्रपट ‘फूल और कांटे’ बेंगळुरूमध्ये एक वर्ष चालला होता.’

आणखी वाचा- कोणाला विसरू इच्छिते कियारा आडवाणी? ब्रेकअपच्या चर्चांनंतर अभिनेत्रीचं उत्तर चर्चेत

याशिवाय आपल्या आणखी एका ट्वीटमध्ये एच डी कुमारस्वामी म्हणतात, ‘अभिनेता किच्चा सुदीपचं हिंदी राष्ट्रभाषेच्याबाबतचं वक्तव्य चुकीचं नाही. त्यांच्या वक्तव्यामुळे चुका काढण्याचं काहीच कारण नाही. अजय फक्त तापट स्वभावाचाच नाही तर त्याचं हे असं वागणंही खूप हास्यस्पद आहे.’ आपल्या पुढच्या ट्वीटमध्ये ते लिहितात, ‘जसं कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम आण मराठी या भाषा आहेत तशीच हिंदी ही देखील एक भाषा आहे. फक्त एक देशाच्या लोकसंख्येचा मोठा भाग ही भाषा बोलतो त्यावरून हिंदीला राष्ट्रभाषा मानता येणार नाही.’

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या व्यतिरिक्त प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मानं देखील या वादावरून बॉलिवूड कलाकारांना सुनावलं होतं. आपल्या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, ‘सुदीप किच्चा सर, हे खरं आहे की, बॉलिवूड कलाकारांना दाक्षिणात्य कलाकांरांबद्दल ईर्षा वाटते. कारण कन्नड डबिंग चित्रपट ‘KGF2’ने ५० कोटीची ओपनिंग कमाई केली होती आणि अलिकडेच प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांकडे पाहिलं तर दोन्हीतील फरक स्पष्ट दिसून येतो.’

काय होतं अजय देवगणचं ट्वीट

अजय देवगणनं काही तासांपूर्वी एक ट्विट केलं होतं. आपल्या ट्वीटमध्ये त्याने लिहिलं, ‘किच्चा सुदीप…, जर तुमच्या मते हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, तर मग तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का प्रदर्शित करता? हिंदी ही आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि नेहमीच असेल. जन गण मन’

किच्चा सुदीपनं दिलं स्पष्टीकरण

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या प्रत्युत्तरानंतर किच्चा सुदीपने सलग तीन ट्विट करत यावर त्याचे मत मांडले. यातील पहिल्या ट्विटमध्ये तो म्हणाला, “सर, मी ज्या संदर्भात हे वक्तव्य केले होते, तो मुद्दा तुम्ही अगदी वेगळ्या पद्धतीने घेतला आहे. कदाचित मी तुम्हाला भेटल्यावर माझा संपूर्ण मुद्दा तुमच्यासमोर अधिक चांगल्या पद्धतीने मांडू शकेन. मला असे बोलायचे नव्हते. कोणाच्याही भावना दुखावणे, कोणत्याही वादाला तोंड फोडणे किंवा त्याला प्रोत्साहन देणे, मी हे असे का करेन सर.”

आणखी वाचा- “दाक्षिणात्य स्टार्सबद्दल…” अजय- किच्चा सुदीप वादानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकानं बॉलिवूडकरांना सुनावलं

“मी माझ्या देशातील प्रत्येक भाषेचा आदर करतो. मला हा विषय अजून पुढे वाढवायचा नाही. मला असे वाटतं की हा विषय आताच संपायला हवा. मी मघाशी म्हटल्याप्रमाणे माझ्या बोलण्याचा हे उद्दिष्ट नव्हते, जे सध्या समजलं जात आहे. तुम्हाला खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा. मी तुम्हाला लवकरच भेटेन, अशी आशा व्यक्त करतो.”

“सर अजय देवगण, तुम्ही जो हिंदी मजकूर पाठवला आहे, तो मला समजला आहे. याचे कारण म्हणजे आपण सर्वजण हिंदीचा आदर करतो. त्यावर प्रेम करतो आणि आम्ही ही भाषाही शिकत आहोत. याची अजिबात लाज वाटत नाही सर. पण मी फक्त हाच विचार करत आहे की मी हेच ट्विट जर कन्नड भाषेत केले असते, तर काय झाले असते. सर आपण सगळे भारताचे आहोत ना?” असे किच्चा सुदीपने म्हटले.

नेमकं प्रकरण काय?

दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपने ‘R’-The Deadliest Gangster Ever या चित्रपटाच्या लाँचिंगला हजेरी लावली होती. यावेळी त्याने दक्षिणेत हिंदी चित्रपट का चालत नाहीत? या सलमान खानच्या प्रश्नाला उत्तर दिले होते. तो म्हणाला की, “दाक्षिणात्य दिग्दर्शक सध्या अशा चित्रपटांची निर्मिती करत आहे ज्याचे जागतिक स्तरावर अस्तित्व असेल. बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शक निर्माते हे तेलुगू आणि तामिळमध्ये चित्रपट डब करत आहेत. पण त्याचे प्रमाण फार कमी आहे.”

“सध्या दक्षिणेत अनेक चित्रपटांची निर्मिती होत आहे, असे तुम्ही काही वेळापूर्वी म्हणालात. पण मला त्यात एक छोटीशी दुरुस्ती करायची आहे. हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही. तर सध्या संपूर्ण सिनेसृष्टी ही विविध भाषांवर चित्रपटांची निर्मिती करताना दिसत आहे. अनेक बॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक तेलुगू, तामिळमध्ये चित्रपट डब करत आहेत. पण त्यांना त्यातून हवे तितके यश मिळत नाही आणि त्याउलट आज आम्ही सर्वत्र चालणारे चित्रपट बनवत आहोत”, असे दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपने म्हटले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Karnataka formar cm h d kumaraswamy reacts on kiccha sudeep ajay devgn hindi language controversy on twitter mrj

ताज्या बातम्या