मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा क्रिकेटविश्वापासून दूर असला तरी तो नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही सध्या परदेशात शिक्षण घेत आहे. सारा लाइमलाइटपासून लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सचिन तेंडुलकरची मुलगी असल्याने साराच्या पोस्टवर नेटकऱ्यांचं चांगलच लक्ष असतं. नुकतंच साराने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे सध्या तिच्या पोस्टची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लंडनमधील एक फोटो अपलोड केला आहे. यात ती काळ्या रंगाची पँट आणि पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या फोटोत तिचे मनमोहक हास्य चार चांद लावत आहेत. हा फोटो पोस्ट करत तिने “All smiles in this city” असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत असून अभिनेता कार्तिक आर्यन आणि अरमान मलिक यांनीही हा फोटो लाइक केला आहे.

सचिनची लेक सारा ही शिक्षणासाठी लंडनमध्ये आहे. सौंदर्याच्या बाबतीत सारा अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत असल्याचे दिसत आहे. साराचे इन्स्टाग्रामवर १४ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सारा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. सारा नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करताना दिसते. साराचा फॅशन सेन्स एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही हे देखील तिच्या अनेक पोस्टवरुन पाहायला मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान कोलकाताचा दमदार फलंदाज आणि टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिल आणि सारा हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. दोघांनी एकाच वेळी “I SPY” असं कॅप्शन लिहून आपापले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तेव्हाही दोघांमध्ये काहीतरी शिजतंय की काय अशी चर्चा सोशल मीडियावर झाली होती. याशिवाय, शुबमन गिलने नव्या कोऱ्या कारसह स्वत:चा फोटो इनस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. त्यावेळीही साराने त्यावर खास कमेंट केली होती.