Katrina Kaif Fitness Mantra : कतरिना कैफ ही बॉलीवूडमधील सर्वांत सुंदर, स्टायलिश व ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या सौंदर्याबरोबरच फिटनेससाठीसुद्धा ती चर्चेत असते. बॉलीवूडला तिने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिने वयाशी चाळिशी ओलांडली याचा अनेकांना विश्वासच बसणार नाही. तिच्या फिटनेसचं रहस्य नेमकं काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत.
२०२४ मध्ये श्लोका या यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत, न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी अभिनेत्रीचा डाएट प्लॅन सविस्तरपणे सांगितला होता. तिने म्हटले होते की, “ती दिवसातून फक्त दोनदाच खाते. ती नेहमीच घरी बनवलेले अन्न खाते आणि ते सोबत घेऊन जाते. तिची जीवनशैली अशी आहे की ती लवकर झोपते आणि लवकर उठते.”
कशी आहे कतरिना कैफची दिनचर्या?
ती पुढे म्हणाली, कतरिना काळे मनुके खाते. तसेच, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी ती बडीशेपदेखील खाते. दिवसातून फक्त दोन वेळाच जेवण करते. याबरोबरच ती भोपळ्याचा रस देखील पिते.”
ती म्हणाली, कतरिना ‘ऑइल पुलिंग’देखील करते. ती नियमितपणे व्यायाम करते. तिला तिच्या शरीराबद्दल अनेक गोष्टी माहीत आहेत आणि त्यामुळे तिला तिच्या आहारात काही बदल करायचे असतील, जसे की लोहयुक्त पदार्थ किंवा कोणता ज्युस घ्यायला पाहिजे, असे प्रश्न जेव्हा कतरिनाला पडतात तेव्हा ती माझ्याबरोबर चर्चा करते.”
कतरिना ‘लीन प्रोटीन’, भाज्या, ब्राउन राइस खाते. ती दुग्धजन्य पदार्थ, ग्लुटेन, गहू आणि जास्त प्रमाणात रिफाइंड साखर टाळते. डिटॉक्सिफिकेशन आणि पचनासाठी ती दररोज दुधीचा रस पिते. जर दुधी उपलब्ध नसेल तर ती पुदिना, आवळा रस पिते. कतरिना दररोज किमान ८-१० ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करते. इलेक्ट्रोलाइट्ससाठी ती नारळपाणीही पिते.
कतरिना फंक्शनल ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ करते. पचन आणि एकूण आरोग्य सुधारण्यासाठी ती शतपावलीचा सराव करते, ज्यामध्ये प्रत्येक जेवणानंतर १०० पावले चालणे समाविष्ट आहे.