अभिनेत्री कतरिना कैफ बॉलिवूडच्या सर्वात्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये तिने अभिनेता विकी कौशलशी लग्न केले. त्यांच्या लग्नाची बातमी हा चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का होता. लग्नाआधी तब्बल दोन वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. या कालावधीमध्ये या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल गोपनीयता पाळली होती. त्यांचे वैवाहिक आयुष्य नेहमी चर्चेत असते.

कतरिना सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ फार व्हायरल होत असतात. तिने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती विकीसह उभी आहे. त्या दोघांसमोर विकीचा भाऊ सनी कौशल आहे. तो दोन्ही हात जोडून त्याच्या वहिनीच्या, कतरिनाच्या पाया पडत आहे. यावर कतरिना आणि विकी दोघेही हसताना दिसत आहेत. आज सनीचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने कतरिनाने हा खास फोटो पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोला तिने “सुखी रहा.. आनंदी रहा..” असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा – “दीदींच्या निधनानंतर एक रितेपण…”, लता मंगेशकरांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची भावूक पोस्ट

कतरिनाच्या या पोस्टमधून ती विकीच्या कुटुंबामध्ये किती रुळली आहे हे दिसून येत आहे. दरम्यान विकीनेही सनीबरोबर फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व गुण सम्पन्न कौशल. खूप प्रेम” असे लिहिले आहे. सनीदेखील अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. त्याने ‘गोल्ड’, ‘शिद्दत’ अशा काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरील ‘द फॉरगॉटन आर्मी’ या वेब सीरिजमध्ये त्याने प्रमुख पात्र साकारले होते.

आणखी वाचा – Bigg Boss 16: “मला १००० कोटी…” सलमान खानचा मानधनाबद्दल खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कतरिना सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या कामांमध्ये गुंतलेली आहे. तिचा ‘भूत पुलिस’ हा चित्रपट काही महिन्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याशिवाय ती श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.